(फोटो सौजन्य: X)
स्वतःला व्हायरल करण्यासाठी लोक अनेक धोकादायक गोष्टी करताना आपल्याला सोशल मीडियावर नेहमीच दिसत असते. इथे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होतात जे आपल्याला आश्चर्याचा धक्का देऊन जातात. त्यातही स्टंटबाजीचा व्हिडिओ म्हणजे लोकांच्या मूळ आकर्षणाचा विषय! अशीच एक जीवघेणी स्टंटबाजी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. शेकडो प्रवाशांच्या जीवाशी खेळत काही तरुण रेल्वे ट्रॅकवर धोकादायक स्टंट करू पाहत होते. शुल्लक लाइक्ससाठी केलेला हा प्रकार इतका व्हायरल झाला की थेट पोलिसांनीच यावर कारवाईचा निर्णय घेतला. चला नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
काय आहे प्रकरण?
उत्तर प्रदेशातील हापूरमध्ये हा प्रकार घडून आला. तरुणाने चांदसर रेल्वे लाईनवर बाईकच्या टायरवर पेट्रोल टाकून आग लावण्याचा धोकादायक स्टंट करू पाहिला. ज्यानंतर ही क्लिप इंटरनेटवर व्हायरल होताच सर्वत्र खळबळ उडाली आणि रेल्वे पोलिसही या प्रकरणी तात्काळ सक्रिय झाले. आरपीएफने हापूर पोलिस स्टेशनमध्ये रेल्वे कायद्याच्या गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आणि ३ तरुणांना अटक केली. रीलसाठी, तरुणांनी त्यांची बाईक प्रथम रेल्वे ट्रॅकवर अडकवली आणि नंतर त्यातील एका टायरवर पेट्रोल टाकत त्याला आग लावली. यानंतर त्यांनी बाईक सुरु करत बाईकचे हे ज्वलंत चाक फिरवायला सुरुवात केली. मात्र त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी तिघांचा शोध घेतला आणि त्यांच्यावर हापूर आरपीएफ पोलिस ठाण्यात रेल्वे कायद्याच्या कलम ३८५/२५, १५३ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे आणि त्यांना तुरुंगात पाठवले.
ये मनबढ़ रेलवे ट्रैक पर रील बना रहे है, बाइक के टायर में इन्होंने पेट्रोल डाल आग लगा दी. इन्हें कायदे की इलाज की जरूरत है. pic.twitter.com/s1MiyG55NW — Priya singh (@priyarajputlive) June 12, 2025
हा व्हिडिओ आपल्याला जाणीव करून देतो की, कोणतीही स्टंटबाजी ही आजूबाजूच्या परिस्थितीचा विचार करूनच करावी. दरम्यान स्टंटबाजीचा हा व्हिडिओ @priyarajputlive नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिले असून अनेकांनी व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये या घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “अशा गाढवांना लाठीने हाणल पाहिजे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “तिघांनाही अटक करण्यात आली आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.