(फोटो सौजन्य: Instagram)
सोशल मीडियावर सध्या एक अनोखा व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात हत्ती आणि घोड्यामधील एक थरारक लढत दिसून आली. समोरासमोर प्राणी भिडल्याचे किंवा शिकारीचे अनेक व्हिडिओज इंटरनेटवर याआधीही शेअर केले गेले आहेत मात्र आताचे हे दृश्य काहीसे वेगळे आहे. हत्ती हा मुळातच एक विशालकाय शरीराकाठी असलेला आणि मजबूत प्राणी आहे तर घोडाही आपल्या वेगात आणि मजबूतीत काही कमी नाही. हत्ती आणि घोड्याला आमने-सामने आल्याचे आजवर कुणीही कधीही पाहिले नाही आणि हेच कारण आहे की त्यांच्यातील ही लढत आकर्षणाचे केंद्र ठरली. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून शेवट नक्कीच तुम्हाला थक्क करून जाईल.
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल व्हि़डिओमध्ये तुम्हा पाहू शकता यात एक पिसाळलेला घोडा अचानक पळत येऊन रस्त्यावर उभ्या असलेल्या हत्तीवर जोरदार हल्ला करत असल्याचे दिसते. घोड्याचा हा हल्ला पाहताच गजराज जरा अस्वस्थ होतो आणि इकडे तिकडे पळू लागतो. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, एक हत्ती रस्त्याच्या कोपऱ्याला उभा असतो यावेळी त्याचा मालकही त्याचा सोबत असतो मात्र तितक्यात मागून एक घोडा त्याच्यावर हल्ला करतो ज्यानंतर हत्ती त्याच्यापासून आपली सुटका करण्यासाठी तिथून पळून जातो. यावेळी हत्तीचा मालक घोड्याला काठीने घाबरवून दूर करण्याचा प्रयत्न करतो मात्र त्याचा काहीच उपयोग होत नाही. पुढे आपल्याला हत्ती घाबरून तिथून पळून जाताना दिसतो मात्र यावेळी घोडाही मागे हटत नाही आणि त्याच्यामागे पळत सुटतो. गजराज पिसाळला तर त्याचे पिसाळलेले रूप सर्वांनाच हैराण करून सोडते मात्र आताच्या व्हायरल व्हिडिओमध्ये गजराजाचे एक भित्रे रूप दिसले जे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.
हा व्हायरल व्हिडिओ @lalluramnews नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत हजारो व्यूज मिळाले असून अनेकांनी व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका यूजरने लिहिले आहे, “घोडा खूप रागावला आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हा घोडा महाराणा प्रतापचा चेतक आहे आणि हत्ती सम्राट अकबराचा आहे, म्हणूनच एवढी भयंकर लढाई होत आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “घोडा हत्तीवर फिदा झाला”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.