Boys had terriffic bike accident video goes viral
सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, कधी चित्र-विचित्र असे व्हिडिओ पाहायला मिळतात. डान्स, स्टंट, जुगाड, यांसारखे भन्नाट रिल्स आपल्याला पाहायला मिळतात. तसेच अलीकडे अपघातांचे देखीस भयंकर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अनेकदा लोकांच्या निष्काळजीपणामुळे हे अपघात घडतात. सध्या असाच एक भयंकर अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये अल्पवीयन मुलांच्या हातात बाईक देणं महागात पडलं आहे. या मुलांचा भीषण अपघात झाला आहे.
या भयंकर अपघाताचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये दोन लहान मुले बाईक चालवताना त्यांचा भीषण अपघात घडला आहे. बाईक थेट वीजेच्या खांबाला जाऊन धडकली आहे. यामुळे मागे बसलेला छोटा मुलगा उडून पडला आहे. तर बाईक चालवणऱ्या मुलालाही गंभीर दुखापत झाल्याचे दिसून येत आहे. व्हिडिओवरुन पाहिले तर अंदाजे बारक्या मुलाचे वय ९-१० वर्ष असले तर बाईक चालवणाऱ्या मुलाचे वय १२-१३ असण्याची शक्यता आहे. ही घटना राजस्थानमध्ये घडली असल्याचे व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये सांगण्यात आले आहे. सुदैवने दोन्ही मुलांचा जीव बचावला आहे. पण या मुलांना बाईकची चावी देणं त्यांच्या पालकांना चांगलेच महगात पडले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
डॉगेश भाईचा जंगलात दरारा! कुत्र्याने भूकंताच सिंहीणीने ठोकली धूम, Video Viral
व्हायरल व्हिडिओ
Bachcho ko bike ki chabi deni padi bhari🤕 Somewhere in Rajasthan. https://t.co/ovyilUqhhF
— Deadly Kalesh (@Deadlykalesh) August 25, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Deadlykalesh या अकाउंटवर शेअक करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिले आहे. अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया देत मुलांना काही झाले तर नाही ना असा प्रश्न केला आहे, तसेच अनेकांनी या पोरांचा हातात बाईक देणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. एका युजरने म्हटले की, सुदैवाने कोणाचाही जीव गेला नाही, तर दुसऱ्या एकाने हाडे तुटली असतील त्या बारक्याची असे म्हटले आहे. तर अनेकांनी पालकांवर टीका केली आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.