Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

समुद्रकिनाऱ्यावर प्रियकरासोबत फिरत होती महिला, तितक्यात अंगावर कोसळली वीज; मृत्यूचा धडकी भरवणारा Video Viral

Death Viral Video : रोमँटिक वातावरण, समुद्रकिनारी जोडीदाराची साथ पण तितक्यात महिलेसोबत घडलं भलतंच. घटनेचे फुटेज सोशल मिडियावर शेअर करण्यात आले असून महिलेच्या नशीबावर लोकांनी खंत व्यक्त केली आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 02, 2026 | 09:06 AM
समुद्रकिनाऱ्यावर प्रियकरासोबत फिरत होती महिला, तितक्यात अंगावर कोसळली वीज; मृत्यूचा धडकी भरवणारा Video Viral

समुद्रकिनाऱ्यावर प्रियकरासोबत फिरत होती महिला, तितक्यात अंगावर कोसळली वीज; मृत्यूचा धडकी भरवणारा Video Viral

Follow Us
Follow Us:
  • जोडीदारासोबत समुद्रकिनारी फिरताना ३९ वर्षीय महिलेवर वीज कोसळली.
  • सीसीटीव्हीत कैद झाला अंगावर काटा आणणारा घटनेचा व्हिडिओ.
  • सीपीआर आणि उपचारांनंतरही महिलेचा दुर्दैवी मृत्यू.
चित्रपटात आपल्या पार्टनरसोबत हिरो-हिरोईनला तुम्ही समुद्रकिनाऱ्यावर फिरताना तर तुम्ही अनेकदा पाहिले असेल. हा एक सीन हा जो एकदा तरी खऱ्या आयुष्यात अनुभवण्याचा विचार प्रत्येकाच्या मनात येतो. सुंदर संध्याकाळ आणि सुमद्रकिनारी जोडीदारासोबत सूर्यास्ताचा आनंद एक रोमँटिक फील देऊन जातो. पण तुमचा हाच रोमँटिक काळ तुमच्या जीवावर बेतू शकतो यावर तुमचा विश्वास बसेल का? अलिकडे अशीच एक घटना सोशल मिडियावर शेअर करण्यात आली आहे ज्यात समुद्रकिनाऱ्यावर जोडीदारासोबत फिरताना महिलेला मृत्यूने गाठलं. या घटनेचे लाईव्ह फुटेज सध्या चांगलेच ट्रेडिंगमध्ये असून व्हिडिओतील दृष्ये अनेकांना हादरवणारी ठरली. चला यात काय घडलं ते जाणून घेऊया.

नेपाळ पुरातील सर्वात भावूक क्षण! कुटुंबाच्या प्राणांसाठी बापाने पणाला लावला जीव; भावूक करणारा Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

मिरर यूकेमधील एका वृत्तानुसार, शुक्रवारी संध्याकाळी ६ वाजताच्या सुमारास ब्राझीलच्या प्रसिद्ध प्रिया दा पिनहेरा (Praia da Pinheira) समुद्रकिनाऱ्यावर ३९ वर्षीय एंडिनारा गोंसाल्वेस अरेजे (Endinara Gonçalves Areze) हिचा मृत्यू झाला. एंडिनारा आपल्या जोडीदारासह समुद्रकिनाऱ्यावर फिरत होती. सर्वकाही सुरळीत सुरु असतानाच अचानक वीजांचा कडकडाट होतो आणि एक वीजेची तार एंडिनाराच्या अंगावर येऊन कोसळतो. एंडिनारा जमिनीवर कोसळते तर तिचा जोडीदार तिला आधार देण्याचा प्रयत्न करतो. या घटनेचे फुटेज समुद्रकिनाऱ्यापासून दूर असणाऱ्या एका सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले असून यात मृत्यूचा थरार स्पष्ट दिसून येतो.

वीज एंडिनारावर कोसळल्याने इतर कुणालाही काही झालं नाही पण एंडिनारा जमिनीवर कोसळून पडली. तिची ही अवस्था पाहून जोडीदार घाबरला आणि त्याने मदतीसाठी हाका मारायला सुरुवात केली. आजूबाजूच्या लोकांनी मदत करण्यासाठी धाव घेतली आणि काही वेळातच इमरजंसी सर्व्हिस टीम घटनास्थळी पोहचली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आणि वैद्यकीय पथकांनी समुद्रकिनाऱ्यावरच एंडिनाराला सीपीआर दिला. त्यानंतर तिला प्राया दो सोन्हो येथील आपत्कालीन विभागात नेण्यात आले, जिथे तिच्या हृदयाला पुन्हा सुरू करण्यासाठी डिफिब्रिलेटरमधून तीन इलेक्ट्रिक शॉक देण्यात आले. उपचारादरम्यान तिला क्षणभर शुद्ध आली पण काहीवेळातच तिचा मृत्यू झाला.

🇧🇷 Holy crap, I’m never going out in a lightning storm again after seeing this Edinara Gonçalves Areze was with her friends on Pinheira Beach in Brazil when she was struck She suffered a cardiac arrest, received CPR and medical care, but died the next day at Hospital Regional… — Mario Nawfal (@MarioNawfal) August 31, 2026

न पासपोर्ट, न व्हिसा! लेकीच्या लग्नाला पोहोचता आले नाही म्हणून आई-वडिलांनी केले ‘डिजिटल कन्यादान’; Video Viral

या घटनेचे फुटेज @MarioNawfal नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आले आहे. घटना सध्या सोशल मिडियावर चांगलीच चर्चेत असून एंडिनाराच्या मृत्यूवर अनेकांनी खंत व्यक्त केली आहे. एका यूजरने म्हटले की, “लहानपणीच हे शिकलो होतो की वादळी पाऊस असताना पाण्याच्या जवळ जाऊ नये. तिचा मृत्यू होणे ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “त्यांच्या अगदी जवळच धातूचा एक प्रचंड खांब होता, पण कसं कुणास ठाऊक, वीज तिच्याच अंगावर जाऊन कोसळली”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “रोमँटिक गेलं खड्ड्यात मी काही पावसात आता समुद्रकिनाऱ्यावर फिरायला जाणार नाही”.

टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.

Web Title: Brazil praia da pinheira woman killed by lightning strike beach viral video cctv rescue tragedy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2026 | 09:06 AM

Topics:  

  • Rain with Thunderstorms
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

नेपाळ पुरातील सर्वात भावूक क्षण! कुटुंबाच्या प्राणांसाठी बापाने पणाला लावला जीव; भावूक करणारा Video Viral
1

नेपाळ पुरातील सर्वात भावूक क्षण! कुटुंबाच्या प्राणांसाठी बापाने पणाला लावला जीव; भावूक करणारा Video Viral

न पासपोर्ट, न व्हिसा! लेकीच्या लग्नाला पोहोचता आले नाही म्हणून आई-वडिलांनी केले ‘डिजिटल कन्यादान’; Video Viral
2

न पासपोर्ट, न व्हिसा! लेकीच्या लग्नाला पोहोचता आले नाही म्हणून आई-वडिलांनी केले ‘डिजिटल कन्यादान’; Video Viral

संपूर्ण शरीर चिखलात बुडालं, त्या निरागस डोळ्यांनी काळीज हेलावलं… नेपाळमधील ६ वर्षांच्या चिमुकलीच्या रेस्क्यूचा Video Viral
3

संपूर्ण शरीर चिखलात बुडालं, त्या निरागस डोळ्यांनी काळीज हेलावलं… नेपाळमधील ६ वर्षांच्या चिमुकलीच्या रेस्क्यूचा Video Viral

हातात तलवार अन् पेटत्या चितेवरून खाल्लं मानवी मांस! ‘किन्नर अघोरी’च्या व्हिडिओने खळबळ; संत समाज आक्रमक
4

हातात तलवार अन् पेटत्या चितेवरून खाल्लं मानवी मांस! ‘किन्नर अघोरी’च्या व्हिडिओने खळबळ; संत समाज आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.