Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काही सेकंदातच लखपतीतून झाला भिकारी! माणूस फोन वापरण्यात बिजी, चोराने बॅगेतून केली 5,50,000 रुपयांची लूट; Video Viral

Theif Viral Video : तो फोन चालवत राहिला आणि अवघ्या काही सेकंदातच चोराने केली लाखोंची लुट. घटना भररस्त्यात घडली असून याचे सीसीटिव्ही फुटेज आता सोशल मिडियावर व्हायरल झाले आहे. व्हिडिओतील दृष्य पाहून तुम्हीही हैराण व्हाल.

  • By नुपूर भगत
Updated On: May 31, 2026 | 08:57 AM
काही सेकंदातच लखपतीतून झाला भिकारी! माणूस फोन वापरण्यात बिजी, चोराने बॅगेतून केली 5,50,000 रुपयांची लूट; Video Viral

काही सेकंदातच लखपतीतून झाला भिकारी! माणूस फोन वापरण्यात बिजी, चोराने बॅगेतून केली 5,50,000 रुपयांची लूट; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • फोनमध्ये गुंतल्यामुळे आजूबाजूला काय घडत आहे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले.
  • गर्दीच्या ठिकाणी काही सेकंदांत घडलेली घटना सीसीटीव्हीत कैद झाली.
  • निष्काळजीपणामुळे मोठे आर्थिक नुकसान झाल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली.
फोनचे व्यसन लोकांना इतके लागले आहे की प्रत्येक वेळी लोक आपल्या स्मार्टफोनला चिटकून असतात. नको त्या वेळी केलेला फोनचा वापर आपल्याला अडचणीत आणू शकतो. यामुळे आजूबाजूला काय चालू आहे यावर आपले लक्ष राहत नाही आणि परिणामी आपली मोठी फसवणूक होऊ शकते. अलिकडे अशीच एक घटना सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे ज्यात फोनच्या नादात व्यक्तीचे लाखो रुपये चोरीला गेल्याचे दिसले. मुख्य म्हणजे त्याच्या मागून ही चोरी भररत्यात केली जात होती पण फोनच्या वापरामुळे व्यक्तीला याची कल्पना आली नाही आणि त्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले. चला नक्की काय घडलं याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया.

नशीबात मृत्यू लिहिलाच नव्हता…! आयुष्य संपवायला वृद्धाने रेल्वे ट्रॅकवर मारली उडी, पुढे लोको पायलटने असं काही केलं की… Video Vi

काय घडलं व्हिडिओत?

सदर घटना ही अहमदाबादच्या माणिक चौकात घडल्याची माहिती आहे. यावेळी रसत्यावर लावण्यात आलेल्या सीसीटिव्ही कॅमेरात संपूर्ण घटना कैद झाली ज्यामुळे ही चोरी कशी झाली ते समोर आले. घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आला असून यातील दृष्यांनी सर्वांनाच अवाक् केले आहे. यात दिसते की, एक व्यक्ती रस्त्यावरुन जात आहे, यावेळी त्याच्या पाठीवर एक पैशांनी भरलेली बॅग असते तर हातात फोन चालवत तो आपल्याच धुंदीत चालत असतो. याच परिस्थितीचा फायदा घेत एक चोर व्यक्तीच्या मागून चालायला सुरुवात करतो आणि संधी साधून शिताफिने त्याच्या बॅगेतून पैशांची गड्डी चोरतो.

व्हिडिओत दिलेल्या माहितीनुसार, व्यक्ती एका सोन्या-चांदीच्या दुकानात काम करतो. तो ही रक्कम बॅगेत भरुन कुठेतरी घेऊन जात असतो आणि याचवेळी रस्त्यात या पैशांची लुट होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे भररस्त्यात चोरी करुनही एकाही माणसाचे लक्ष चोरावर जात नाही. व्हायरल व्हिडिओनुसार, चोराने बॅगेतून साडे पाच लाखांची लूट केली.

घटनेचा हा व्हिडिओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘अहमदाबादच्या गजबजलेल्या ‘माणेक चौका’त दिवसाढवळ्या एका सराफा व्यापाऱ्याच्या कर्मचाऱ्याकडून चोराने ५.५० लाख रुपये हिसकावून नेले! फोनवर बोलण्यात मग्न असलेल्या त्या कर्मचाऱ्याचे लक्ष विचलित झाले आणि अवघ्या काही सेकंदांतच ही चोरी सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. या चोरीचा व्हायरल झालेला व्हिडिओ एखाद्या चित्रपटातील दृश्यासारखाच भासतो.’

Thief snatches ₹5.50 lakh from bullion trader’s employee in broad daylight at crowded Ahmedabad’s Manek Chowk! Victim distracted on phone, theft caught on CCTV in seconds. Viral video looks straight out of a movie. 😱
pic.twitter.com/LeC9PIwQoT
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) May 30, 2026

काल्पनिक की खरं सत्य? रंगीत नाही, मोराचा पांढराशुभ्र पिसारा… राष्ट्रीय प्राण्याचे अद्भूत रुप पाहून यूजर्स घायाळ; Video Viral

घटना गंभीर असून अनेक यूजर्सने यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यात एका यूजरने म्हटले की, “जर ती बॅग माझ्याकडे असती, तर मी दर ५ सेकंदांनी ती तपासून पाहिली असती”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हे अत्यंत निष्काळजीपणाचे आणि गोष्टी गृहीत धरण्यासारखे वर्तन आहे; जर तुमच्याकडे ५.५० लाख रुपये होते, तर तुमच्या आजूबाजूला नक्की काय घडत आहे याची तुम्हाला जाणीव का नव्हती? यात पूर्णपणे त्या सराफ व्यापाऱ्याच्या कर्मचाऱ्याचाच दोष आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “ते गुन्ह्यात सहभागी असू शकतात. इतके पैसे असलेली बॅग पाठीवर कोण ठेवते? मुंबई लोकल ट्रेनने प्रवास करणारे सर्व प्रवासी आपली बॅग समोरच ठेवतात”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Cctv footage ahmedabad manek chowk man stole rs 5 5 lakh from the bag viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2026 | 08:57 AM

Topics:  

  • Gujrat
  • trending
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

नेपाळ पुरातील सर्वात भावूक क्षण! कुटुंबाच्या प्राणांसाठी बापाने पणाला लावला जीव; भावूक करणारा Video Viral
1

नेपाळ पुरातील सर्वात भावूक क्षण! कुटुंबाच्या प्राणांसाठी बापाने पणाला लावला जीव; भावूक करणारा Video Viral

न पासपोर्ट, न व्हिसा! लेकीच्या लग्नाला पोहोचता आले नाही म्हणून आई-वडिलांनी केले ‘डिजिटल कन्यादान’; Video Viral
2

न पासपोर्ट, न व्हिसा! लेकीच्या लग्नाला पोहोचता आले नाही म्हणून आई-वडिलांनी केले ‘डिजिटल कन्यादान’; Video Viral

संपूर्ण शरीर चिखलात बुडालं, त्या निरागस डोळ्यांनी काळीज हेलावलं… नेपाळमधील ६ वर्षांच्या चिमुकलीच्या रेस्क्यूचा Video Viral
3

संपूर्ण शरीर चिखलात बुडालं, त्या निरागस डोळ्यांनी काळीज हेलावलं… नेपाळमधील ६ वर्षांच्या चिमुकलीच्या रेस्क्यूचा Video Viral

हातात तलवार अन् पेटत्या चितेवरून खाल्लं मानवी मांस! ‘किन्नर अघोरी’च्या व्हिडिओने खळबळ; संत समाज आक्रमक
4

हातात तलवार अन् पेटत्या चितेवरून खाल्लं मानवी मांस! ‘किन्नर अघोरी’च्या व्हिडिओने खळबळ; संत समाज आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.