Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुलीने साजरा केला बापाचा आनंद, महाराष्ट्र पोलिसात भरती होताच वडिलांना खांद्यावर उचलून नाचवलं; हृदयस्पर्शी Video Viral

Daughter-Father Video : आई-बापाच्या कष्टांना तिने सार्थकी लावलं...! महराष्ट्र पोलिसात भरती होताच मुलीने वडिलांना खांद्यावर उचलून आपल्या यशाचा आनंद साजरा केला. घटना बीड येथील असल्याचे सांगण्यात येत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 12, 2026 | 09:25 AM
मुलीने साजरा केला बापाचा आनंद, महाराष्ट्र पोलिसात भरती होताच वडिलांना खांद्यावर उचलून नाचवलं; हृदयस्पर्शी Video Viral

मुलीने साजरा केला बापाचा आनंद, महाराष्ट्र पोलिसात भरती होताच वडिलांना खांद्यावर उचलून नाचवलं; हृदयस्पर्शी Video Viral

Follow Us
Follow Us:
  • कुटुंबासाठी अभिमानाचा आणि भावनिक क्षण ठरलेला एक प्रसंग.
  • सोशल मिडियावर व्हिडिओ पाहून अनेकांचे मन भरून आले.
  • वडील आणि मुलीमधील खास नात्याची झलक पाहायला मिळाली.
कोणत्याही आई-वडिलांसाठी त्यांच्या आयुष्यातील सर्वात सुखद आनंद म्हणजे त्यांच्या मुलाचं किंवा मुलीचं यश आपल्या डोळ्यांनी पाहावं. हे सुख मिळवण्यासाठी आई-वडिला आतोनात मेहनत करत असतात. मोठ्या कष्टाने ते आपल्या मुलांना शिकवतात त्यांना मोठ करतात फक्त एका आशेने की त्यांनी त्यांच्या आयुष्यात काहीतरी चांगलं कराव. आपल्या आईवडिलांना आपल्या यशाचा आनंद साजरा करताना पाहणं याहून मोठं सुख नाही. अलिकडे यासंबंधित एक व्हिडिओ सोशल मिडियावर वेगाने व्हायरल झाला आहे ज्यात मुलीच्या नोकरीचा आनंद बाप-लेक मोठ्या उत्साहात साजरा करताना दिसले. घटना बीड येथे घडली असून याच्या व्हिडिओने आता इंटरनेटवर सर्वांचाच उर भरुन आला आहे. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

Video Viral : भाविक भजनात होते दंग अन् क्षणातच होत्याच नव्हतं झालं… मथुरा बोट अपघाताआधीचा व्हिडिओ आला समोर

काय दिसलं व्हिडिओत?

सदर व्हिडिओ हा महाराष्ट्रातील बीड येथून समोर येत आहे. व्हिडिओमध्ये यशाचा जल्लोष मोठ्या उत्साहात लोक साजरा करताना दिसत आहेत. तर यातील लक्षवेधी गोष्ट बाप-लेकीची जोडी ठरली आहे. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो यात दिसते की, मुलीने आपल्या वडिलांना खांद्यावर बसवले आहे आणि आनंदातच ते दोघेही नाचत आहे. माहितीनुसार, मुलगी महाराष्ट्र पोलिसात भरती झाल्याचे सांगितले जात आहे. तिच्या यशानिमित्तच हा जल्लोष साजरा केला जात होता ज्यात वडिलांना खांद्यावर बसवून तिने आपला आनंद साजरा केला. वडिलांना आपल्या मुलीवर विश्वास होता की ती एक दिवस यशस्वी होईल आणि जेव्हा तो दिवस सत्यात उतरला तेव्हा त्यांचा उर अभिमानाने भरुन आला. व्हिडिओतील दृष्यांनी यूजर्सचे लक्ष वेधले असून बापाच्या आनंदाने अनेकांना सुखद आनंद दिला. ही घटना मनाली जोडणारी होती जी प्रत्येकाला आपल्या आयुष्यात अनुभवण्याची इच्छा असते. बापाला लेकीने मिळवून दिलेला तो आनंद त्याच्या संपूर्ण जीवनाच्या कष्टाला सार्थकी लावतो.

पोपट बनला जलपरी… मालकाच्या युक्तीने पक्ष्याने समुद्राच्या पाण्यात केला विहार; Viral Video ने सर्वांनाच केलं अवाक्

हा व्हिडिओ @upsc_trick_only नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. “आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण” असे व्हिडिओत लिहिण्यात आले आहे. व्हिडिओवर कमेंट्स करत अनेकांनी या दृष्यांवर आपले प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यात एका यूजरने म्हटले की, “मुलीला माता जगदंबाचे स्वरुप का मानले जाते ते तू सिद्ध केलंस ताई”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आज मी पाहिलेला सर्वात सुंदर व्हिडिओ” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “खरंच याहून सुंदर सुख नाही”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Daughter lifts father onto her shoulders and dances happily to celebrate joining maharashtra police viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2026 | 09:25 AM

Topics:  

  • Beed
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

२०० वर्षांनंतर कुटुंबात जन्माला आली ‘लक्ष्मी’! कुटुंबाने रथ-ढोल-ताशांच्या गजरात लेकीचे केले ग्रँड वेलकम; Video Viral
1

२०० वर्षांनंतर कुटुंबात जन्माला आली ‘लक्ष्मी’! कुटुंबाने रथ-ढोल-ताशांच्या गजरात लेकीचे केले ग्रँड वेलकम; Video Viral

कलियुगातील ‘श्रावणबाळ’! आईला घमेल्यात बसवून अन् डोक्यावर उचलून पोहोचला बांके बिहारीच्या दरबारी; Video Viral
2

कलियुगातील ‘श्रावणबाळ’! आईला घमेल्यात बसवून अन् डोक्यावर उचलून पोहोचला बांके बिहारीच्या दरबारी; Video Viral

जमिनीच्या वादातून मुलं झाली हैवान, रस्त्यावरच जन्मदात्या वडिलांना केली बेदम मारहाण; पुण्यातील घटनेचा Video Viral
3

जमिनीच्या वादातून मुलं झाली हैवान, रस्त्यावरच जन्मदात्या वडिलांना केली बेदम मारहाण; पुण्यातील घटनेचा Video Viral

भारतीय टपाल विभागाचा मोठा उपक्रम! टपाल अन् पार्सल आता सायकलवरून नाही, थेट आकाशाच्या मार्गाने पोहचणार घरी; Video Viral
4

भारतीय टपाल विभागाचा मोठा उपक्रम! टपाल अन् पार्सल आता सायकलवरून नाही, थेट आकाशाच्या मार्गाने पोहचणार घरी; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.