(फोटो सौजन्य: X)
याआधीही सोशल मिडियावर या अपघाताचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यात लोक नदीत बुडताना आणि मदतीसाठी आक्रोश करताना दिसून आले. अशातच आता मात्र इथे आणखी एक दुसरा व्हिडिओ व्हायरल झाला आहे जो अपघाताच्या काही वेळाआधीचा असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये लोक बोटीत बसून पाण्याच्या सफरचा आनंद लुटताना दिसले. अनेक लोक यावेळी देवाचे नाव घेत भजन गाण्यात मग्न होते. गाताना त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता पण काही वेळातच त्यांचा हा आनंद अशा दुःखात बदलला ज्याचा कुणी विचारही केला नसावा.
How negligence cost lives of 10 Punjab devotees Steamer packed beyond capacity in UP’s Mathura. Devotees from Punjab chanting “Radhe Radhe”. None of them wearing life jacket. The boat capsized, 10 people died. pic.twitter.com/EPiotRTbQZ — Piyush Rai (@Benarasiyaa) April 10, 2026
काय घडलं व्हिडिओत?
देवाचं नामस्मरण करत बोटीतून सफर करणाऱ्या लोकांसोबत पुढे मोठी घटना घडली. यमुना नदीत बोट अचानक उलटली आणि यामुळे संपूर्ण परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. व्हिडिओमध्ये तुम्ही अपघातापूर्वी नक्की काय घडलं ते स्पष्ट पाहू शकता. बोटिंग दरम्यान भाविक भजन-कीर्तन करताना दिसले. या अपघातात अजूनही पाच जण अद्याप बेपत्ता आहेत. पुरुष आणि महिलांसह एकूण १० मृतदेह सापडले आहेत. बोटीत एकूण ३७ लोक प्रवास करत असल्याची माहिती असून बेपत्ता लोकांच्या शोधकार्याला सुरुवात केली गेली आहे. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ @Benarasiyaa नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






