(फोटो सौजन्य: Instagram)
मुलगा बनला मुलगी…
क्रिएटरने दिलेल्या माहितीनुसार, रस्त्यावरुन जाताना अनेकांचे लक्ष त्याच्याकडे गेले. तरुणाने एक ड्रेस परिधान केलेला असतो, तसेच चेहऱ्यावर मेकअप करुन दाढी लपवण्यासाठी त्याने आपला अर्धा चेहरा स्कार्फने झाकलेला असतो. साधरण २ तास तो बाईकवरुन फेरफटका मारतो आणि आजूबाजूच्या लोकांच्या रिएक्शन्स आपल्या फोनच्या कॅमेरात कैद करतो. यावेळी त्याला एक वाईट अनुभव येतो. तो सांगतो की, बाईकवर फिरताना रिक्षाचालक आणि काही अन्य ड्रायव्हर्स सतत त्याला पाहत होते. त्याने सांगितले की, दोन माणसांनी आधी त्याच्याकडे पाहिले आणि नंतर जवळ येण्याच्या प्रयत्नात त्याचा पाठलाग करू लागले. प्रवासादरम्यान, आणखी एक माणूस त्याच्याजवळ आला आणि त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न त्याने केला.
परिस्थिती भीषण तेव्हा बनली जेव्हा एका रिक्षाचालकाने आपली गाडी तरुणाच्या बाईकसोबत चालवायला सुरुवात केली. क्रिएटरने दिलेल्या माहितीनुसार, ड्रायव्हरला जेव्हा ध्यानात आले की दुसरा मित्र मागून त्यांचा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा तो तिथून लगेच आपली रिक्षा घेऊन निघून गेला. आपला अनुभव शेअर करताना क्रिएटरने शेवटी सांगितले की, “हे खरंच खूप भीतीदायक होत आहे. मला वाटतं आपण हे थांबवलं पाहिजे.”
View this post on Instagram
या व्हिडिओवरुनच आपण महिलांच्या सुरक्षेसाठीची अभाव पाहू शकतो. दिल्लीत आजही रात्रीच्या वेळी महिलांचे बाहेर पडणे सुरक्षित मानले जात नाही. यामागे महिलांचे कपडे जबाबदार ठरत नाहीत तर पुरुषांची वाईट प्रवृत्ती जबाबदार ठरते. विचार करा, काही लोकांच्या वाईट विचारांमुळे दुसऱ्याचे स्वातंत्र्य हिरावले जाणे ही फार भीषण परिस्थिती आहे. क्रिएटरने व्हिडिओ शूट करत खरं काय आणि रात्रीच्या वेळी घराबाहेर पडल्यानंतर महिलांसोबत काय काय घडू शकतं याची एक झलक शेअर केली जिला पाहून सर्वच थक्क झाले. हा व्हिडिओ @bejaintle नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.
टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.






