Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दारू पिऊन बनला तपस्वी! नशेत उड्डाणपुलाच्या छतावर चढून तरुण करू लागला साधना; Video Viral

नशेत माणूस काय करेल याचा काही नेम नाही! कुटुंबीयांशी वाद झाल्यानंतर तरुणाने थेट फ्लायओव्हरच्या छतावर चढून चक्क साधनेला सुरुवात केली. हिमालयाऐवजी फ्लायओव्हरलाच ध्यानधारणेचं ठिकाण बनवल्याचं हे दृश्य पाहून रस्त्यावरून जाणारे लोकही चक्रावले.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 06, 2026 | 02:56 PM
दारू पिऊन बनला तपस्वी! नशेत उड्डाणपुलाच्या छतावर चढून तरुण करू लागला साधना; Video Viral

दारू पिऊन बनला तपस्वी! नशेत उड्डाणपुलाच्या छतावर चढून तरुण करू लागला साधना; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • नशेत तरुणाची फ्लायओव्हरवरच साधना
  • हातांनी ओम करत छतावर मांडी घालून बसला
  • उंचीवर बसल्याने जीवाला मोठा धोका
नशेत व्यक्ती कधी काय करेल याचा नेम नाही. आता हेच पाहा ना… नशेत बेधुंद होऊन व्यक्ती चक्क साधु बनला आणि त्याने हिमालयात नव्हे तर उड्डाणपुलाच्या छतावर चढून अनोखी साधना करायला सुरुवात केली. ही घटना सध्या चांगलीच चर्चेत असून याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. रस्त्याने जाणाऱ्या अनेक प्रवाशांनी व्यक्तीचा हा अनोखा कारनामा पाहिला आणि आपल्या मोबाईलच्या कॅमेरात हे दृष्य कैद करण्यास सुरुवात केली. घटना नक्की कुठे घडली याची मात्र अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

एकट्यानेच नदी साफ करणाऱ्या ‘बिट्टू तबाही’ला थेट परदेशी CEO कडून जॉब ऑफर! सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

काय घडलं व्हिडिओत?

व्हिडिओमध्ये मागून एका पुरुषाचा आवाज ऐकू येतो , जो म्हणतो की कोणीतरी दारूच्या नशेत फ्लायओव्हर चढला आहे आणि स्वतःला संन्यासी समजत आहे. व्यक्तीला फ्लायओव्हरच्या छतावर पाहून अनेकांना धक्का बसला तर हा व्यक्ती नक्की तिथे पोहचला कसा याविषयीही अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला. सांगितले जात आहे की, काैटुंबक वादानंतर व्यक्तीने मद्यपानाचे सेवन केले आणि नशेतच तो उड्डाणपुलाच्या छतावर जाऊन बसला. हातांचा ओम तयार करुन माणूस अगदी साधकाप्रमाणे मांडी घालून फ्लायओव्हरवर बसलेला आढळला ज्याला पाहून कुणाही म्हणेल की, हा साधू तर नाही…

‘मुली फॉलो करणार नाहीत तोपर्यंत रुळावरून हटणार नाही!’; फॉलोअर्ससाठी व्यक्तीने दिले मृत्यूला आमंत्रण; Video Viral

संपूर्ण घटनेतील सर्वात चिंताजनक बाब म्हणजे, तरुण जिथे बसला होता, त्याच्या खालील रस्त्यावरून अनेक वाहने जात होती. इतक्या उंचीवर नशेच्या अवस्थेत बसणे त्याच्या जीवासाठी धोकादायक ठरु शकते. यावेळी केलेला थोडाही निष्काळजीपणा त्याच्या जीवावर बेतू शकतो. या घटनेत पुढे काय घडलं, व्यक्ती खाली उतरला की नाही आणि उतरला तर कसा याविषयीची कोणतीही सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही. व्हिडिओला @thebhartiyasarcasm_ नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आले आहे. अनेक यूजर्सने व्हिडिओतील या घटनेवर आपल्या प्रतिक्रया व्यक्त केल्या असून एका यूजरने म्हटले की, “हिमालय महाग पडला म्हणून फ्लायओव्हरवरच तपश्चर्या सुरू”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “दारू उतरली की साधुत्वही उतरेल बहुतेक!”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “नशा अशी असावी की फ्लायओव्हरही हिमालय वाटावा!”.

टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.

Web Title: Drunk man climbs on flyover roof and started doing meditation video went viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2026 | 02:56 PM

Topics:  

  • Flyover
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

BLA Hakkal Video: 25 पाकिस्तानी सैनिकांना ठार मारून ‘ॲक्शन’ व्हिडिओ केला रीलीज; BLA चे असिम मुनीर यांना उघड आव्हान
1

BLA Hakkal Video: 25 पाकिस्तानी सैनिकांना ठार मारून ‘ॲक्शन’ व्हिडिओ केला रीलीज; BLA चे असिम मुनीर यांना उघड आव्हान

एकट्यानेच नदी साफ करणाऱ्या ‘बिट्टू तबाही’ला थेट परदेशी CEO कडून जॉब ऑफर! सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव
2

एकट्यानेच नदी साफ करणाऱ्या ‘बिट्टू तबाही’ला थेट परदेशी CEO कडून जॉब ऑफर! सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

‘मुली फॉलो करणार नाहीत तोपर्यंत रुळावरून हटणार नाही!’; फॉलोअर्ससाठी व्यक्तीने दिले मृत्यूला आमंत्रण; Video Viral
3

‘मुली फॉलो करणार नाहीत तोपर्यंत रुळावरून हटणार नाही!’; फॉलोअर्ससाठी व्यक्तीने दिले मृत्यूला आमंत्रण; Video Viral

‘सर आम्हाला सोडून जाऊ नका…’; शिक्षकाचे ट्रान्सफर अन् मिठी मारून ढसाढसा रडले विद्यार्थी, Video Viral
4

‘सर आम्हाला सोडून जाऊ नका…’; शिक्षकाचे ट्रान्सफर अन् मिठी मारून ढसाढसा रडले विद्यार्थी, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.