सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. हे व्हिडिओ कधी आपल्याला हसवतात तर कधी आपल्याला थक्क करून जातात. तसेच यात बऱ्याचदा काही धक्कादायक घटनांचाही समावेश असतो. सध्या अशीच एकधक्कादायक घटना सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यात एक व्यक्ती आपण पोलीस आहोत असे म्हणत एकट्या तरुणीची फाकवणूक करताना दिसून येत आहे. मात्र घडतं काही भलतंच. व्हिडिओचा शेवट पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
नेमकं काय घडलं?
तरुणीने व्हिडिओमध्ये दिलेल्या माहितीनुसार, ही सर्व घटना अंधेरी येथील MIDC सेंट्रल रोडवर घडली आहे. तर घडलं असा की, एक तरुण आपण पोलीस आहोत असे सांगत चालू रिक्षात जाऊन बसला. या रिक्षात एक तरुणी बसलेली होती. तरुणीला एकटे पाहून त्याने या संधीचा फायदा घेण्याचा विचार केला. यांनतर तो तरुणीला धमकवू लागला. तसंच रिक्षा पवई येथील पोलीस स्टेशनमध्ये नेण्यास सांगू लागला.
हेदेखील वाचा – बिल्डिंगच्या खोलीत राहण्यासाठी तरुण देतो फक्त 15 रुपये भाडे, फोटो शेअर करताच सर्व झाले चकित
आपण काहीही केले नसल्याने तरुणीने पवईला जाण्यास नकार दिला. तरुणीला संशयास्पद वाटल्याने तिने ही सर्व घटना आपल्या कॅमेरात कैद केली. यावेळी ती या तरुणीचा देखील व्हिडिओ काढू लागली. आपला व्हिडिओ काढल्याचे पाहताच तरुण घाबरला. तसेच त्याने तरुणीच्या हातातून फोन हिसकावण्याचा देखील प्रयत्न केला. आपलं खोत पकडलं गेलं हे समजताच दुसऱ्याच क्षणी तो रिक्षातून बाहेर निघाला. तरुणीच्या चपळतेने तिला फसवणुकीचा शिकार होण्यापासून वाचवले. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकजण तरुणीच्या धाडसाची प्रशंसा करत आहेत.
हा व्हायरल व्हिडिओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, मुंबईत एका बनावटी पोलिसाने तरुणीला फसवण्याचा प्रयत्न केला असे लिहिण्यात आले आहे. यावेळी त्याने तरुणीकडे 50 हजार रुपयांची मागणी केली असेही सांगण्यात आले आहे.
Encounter with a Suspicious Cop Over a Vape in Mumbai. Asked 50k to let go (Fake Cop tried to Scam a Girl over Vape in Mumbai MH)
pic.twitter.com/tVAjCi3GeD— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) October 15, 2024
हेदेखील वाचा – दारूच्या नशेत बसलेल्या व्यक्तीच्या अंगावर अजगराने घातला विळखा, क्षणार्धात डाव पलटला अन् … Video Viral
व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया मांडल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “मुंबईत आणखी एक दिवस, जिथे तुमचा व्हॅप तपासण्यापूर्वी तुम्हाला पोलिस खरा आहे की नाही हे तपासावे लागेल! नेहमी सजग रहा आणि ‘बनावट’ ला तुमची भावना खराब होऊ देऊ नका. #सुरक्षित रहा” दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “धाडसी आणि हुशार मुलगी, त्याच्याशी शाब्दिक वाद घालण्याऐवजी, तिने तिचे मन एकत्र केले आणि लक्षात आले की या व्यक्तीमध्ये काहीतरी चुकीचे आहे आणि तिने एक व्हिडिओ काढून स्वतःला वाचवण्यात यश मिळवले जे खऱ्या पोलिसांना या फोनी कॉपला ओळखण्यास मदत करेल.