(फोटो सौजन्य: Instagram)
सोशल मीडियावर दररोज काही ना काही व्हायरल होत असतं. इथे अनेक अशा घटना शेअर केल्या जातात ज्यातील दृश्यांचा आपण कधी स्वप्नातही विचार केला नसेल. मनाला हेलावून टाकणारे, थक्क करणारे बरेच व्हिडिओ इथे शेअर केले जातात आणि अशातच आणखीन एक धक्कादायक घटना इथे व्हायरल झाली आहे जी सर्वांनाच हादरवून सोडत आहे. वास्तविक यात केलेल्या दाव्यानुसार, एका अजगराने जिवंत मुलाला गिळून टाकल्याची घटना घडली आहे. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
नक्की काय घडलं?
व्हिडिओत अजगराचे शरीर मधून मोठे दिसत आहे ज्यावरून त्याचे खरोखर कुणालाही तरी गिळले असल्याचे स्पष्ट होते. व्हिडिओत अजगराच्या आजूबाजूला लोकांचा घोळखा दिसून येतो आणि यातच एक व्यक्ती हंबरडा फोडून रडत असतो. दाव्यानुसार हा व्यक्ती अजगराने गिळून टाकलेल्या मुलाचा वडील असून आपला मुलगा गमावल्यामुळे तो मोठमोठ्याने रडताना यात दिसून येते. व्हिडिओमध्ये जंगलात जमिनीवर पडलेला एक मोठा अजगर दिसतो. त्याच्या जवळ एक व्यक्ती रडत आहे आणि त्याच्या शरीरावर जोरजोरात मारत आहे. व्हिडिओमध्ये त्याचे दुःख स्पष्टपणे दिसून येते. ही घटना खरोखर धक्कादायक असून ही ती नक्की कुठे घडून आली ते अद्याप समोर आले नाही. दरम्यान अशा घटना आपल्याला निसर्गाच्या क्रूरतेची आणि वन्य प्राण्यांच्या धोक्याची आठवण करून देतात.
View this post on Instagram
A post shared by ̶G̶i̶r̶a̶w̶a̶d̶i__̶o̶f̶f̶i̶c̶ia̶l -गिरावड़ी (@girawadi__official)
हा व्हायरल व्हिडिओ @girawadi__official नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “अजगराला मध्यभागी कापून टाका आणि त्या माणसाला बाहेर काढा” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “त्या माणसाला बाहेर काढले आहे पण तो वाचू शकला नाही” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “माणसाला गिळणे शक्य नाही; त्याने एखाद्या मोठ्या प्राण्याला खाल्ले असेल”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.