(फोटो सौजन्य: Instagram)
सोशल मीडियावर कधी काय घडून येईल ते सांगता येत नाही. इथे दररोज अनेक धक्कादायक व्हिडिओज व्हायरल होत असतात ज्यातील दृश्ये आपल्या काल्पनिकडचे ठरतात. अशातच आता असाच एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ज्यातील दृश्यांनी सर्वांनाच हादरवून सोडले आहे. तुम्ही इंटरनेटवर ऍक्टिव्ह असाल तर इथे अनेक विचित्र व्हिडिओज व्हायरल होताना तुम्ही पाहिले असेल. लोक स्वतःला व्हायरल होण्यासाठी नको नको ते प्रकार करतात आणि आताही व्हिडिओत असेच काही घडून आले आहे. तरुणाने व्हिडिओसाठी असे धक्कादायक कृत्य केले की पाहून सर्वच हादरून गेले. चला नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तरुण चक्क बाईकचे इंजिन ऑइल पिताना दिसून आला आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला, तो तरुण त्याच्या बाईकचे इंजिन झाकण उघडतो आणि नंतर त्यातून जाड, काळे तेल काढतो. यानंतर, तो कॅमेऱ्याकडे पाहतो आणि म्हणतो, “मित्रांनो, मी आज सकाळपासून काहीही खाल्ले किंवा प्यायलेले नाही, म्हणून आता मी माझ्या बाईकचे इंजिन ऑइल पिणार आहे.” हे बोलल्यानंतर, तो इंजिन ऑइल पिण्यास सुरुवात करतो एखादी कोल्ड्रिंक प्यावी तसा तो घटाघट इंजिन ऑइल पिऊ लागतो. तरुणाच्या या व्हिडिओला आता युजर्सकडून संतापजनक प्रतिक्रिया मिळत असून लोक आता निव्वळ वेडेपणा मानत आहेत. दरम्यान तरुणाने खरोखर इंजिन ऑइल प्यायले की हे फक्त नाटक होते ते अद्याप स्पष्ट झाले नाही.
पांचट Jokes : पिंट्याचा शहाणपणा की पप्पांचं कॅरेक्टर? वाचाल तर हास्याच्या पुराला बळी पडाल
तरुणाचा हा व्हायरल व्हिडिओ @mkvibes87 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “अरे मरून जाशील” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “स्पष्ट दिसत आहे की संपूर्ण इंजिन ऑईल खाली पडलं आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “व्हायरल होण्याच्या नादात शहीद होऊन जाशील बावळट”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.