तरुणीच्या गळ्याभोवती घातला सापाने विळखा मग तरुणीने केलं असं पाहून तुमचाही उडेल थरकाप, Video Viral
अनेक धोकादायक प्राण्यांपैकीच साप हा एक प्राणी आहे. तो आपल्या विषारी दंशासाठी ओळखला जातो. सापाचा दंश एकदा का कोणाला लागला की त्याचे वाचणे काही खरे नाही. सापाला पाहताच प्राणीच काय तर माणसंही दुरूनच पळू लागतात. सापाचे अनेक व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यात सापाच्या थरारकत्याचे दर्शन घडते मात्र सध्या सापाचा जो व्हिडिओ व्हायरल होत आहे तो पाहून तुम्ही थक्क झाल्याशिवाय राहणार नाही.यात मुलीने सापाची केलेली दुर्धशा दिसून येत आहे.
अनेकदा साप दिसताच लोक पळायला लागतात. पण असे काही लोक आहेत जे सापांना अजिबात घाबरत नाहीत आणि त्यांना हाताशी धरतात. आता या मुलीलाच बघा, जिच्या शब्दकोशात सापांची भीती नाही. एखाद्या खेळण्याशी खेळत असल्याप्रमाणे मुलीने सापाला पकडले. या मुलीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओतील सापाची अवस्था पाहून आता अनेकजण थक्क झाले आहेत. तसेच अनेकजण मुलीच्या धाडसी वृत्तीचे कौतुक देखील करत आहेत.
हेदेखील वाचा – आता तर हद्दच झाली! कुत्र्याने नाही तर माणसानेच घेतला श्वानाचा चावा, धक्कादायक घटनेचा Video Viral
काय आहे व्हिडिओत?
व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, मुलगी हातात साप घेऊन झुडपाजवळ उभी आहे. साप मुलीच्या अंगाला चिकटून बसला असून मुलगी त्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. या काळात मुलीला साप चावला तर काय होईल याची जराही भीती वाटत नाही. पण सापही मुलीला काही करत नाही. तो फक्त तिच्या शरीराभोवती विळखा घालत आहे. ती मुलगी त्या सापावर नियंत्रण ठेवते. व्हिडीओ पाहून तो एखाद्या शाळेतील किंवा महाविद्यालयातील असल्याचे समजते. साप बाहेर आल्यावर या मुलीने त्याला पकडून चांगलीच अद्दल घडवली आहे. ही मुलगी सापाला घेऊन शाळेच्या आवारात येताच इतर विद्यार्थी घाबरून तिच्यापासून दूर पळू लागले. तसेच काही विद्यार्थी मुलीचे धाडस पाहून तिच्याकडे बघतच बसतात.
Finally a girl without makeup kit 💀 pic.twitter.com/8waK803nx5
— Introvert //🙇🏻♂️ (@introvert_hu_ji) October 30, 2024
हेदेखील वाचा – एकदमसे वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए! तरुणीने केलं असं काही… Viral Video पाहून तुम्हीही पोट धरून हसाल
हा व्हायरल व्हिडिओ @introvert_hu_ji नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला 6 लाखाहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तसेच अनेकांनी व्हिडिओवर कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, ती अजिबात घाबरली नाही” तर दुसऱ्या युजरनरे लिहिले आहे, “हे खूप भीतीदायक आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “हिला झाशीची राणी म्हणतात जी शौर्याने लढली”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.