लाईक्स व्ह्यूजने घेतला जीव? ज्वालामुखीजवळ स्टंट करताना तरुणाचा पाय घसरला अन्...; अंगावर काटा आणणारा Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
अल काका अंतर अल-अब्सीला येमेनचा स्पायडर मॅन म्हणूनही ओळखले जाते. तो त्याच्या जीवघेण्या स्टंटसाठी प्रसिद्ध आहेत. उंच डोंगर, धोकादायक कडे आणि कठीण खडकांवर कोणतीही भीती न बाळगता स्टंट करण्यासाठी सोशल मीडियावर प्रसिद्ध आहेत. यावेळी तो हरधा ज्वालामुखीच्या परिसरात स्टंट करत होते. मात्र हा स्टंट त्यांना जीवावर बेतला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, अल-अब्सी ज्वालामुखीच्या काठावर उभा राहून स्टंट करत आहे. त्याचे साथीदार याचा क्षण मोबाईल कॅमेरात कैद करत आहेत. याच वेळी त्याचा अचाक तोल जातो आणि तो खाली दरीत कोसळला आहे. त्यांनी स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु उतार जास्त असल्याने ते शक्य झाले नाही.
Estes foram os momentos finais do aventureiro Al-Qa’qa’ Antar Al-Absi, o “Spider-Man do Iêmen”, antes de cair na cratera do vulcão Haradha (Damt), no Iêmen. Ele escalava a parede interna da cratera sem qualquer equipamento de segurança, como sempre fazia. Escorregou, perdeu o… pic.twitter.com/EprKxFcM0G — Conservatism And Elegance 🇺🇲 (@ThayzzySmith) June 13, 2026
घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच मोठा गोंधळ उडाल आहे. घटनास्थळी रेकॉर्डिंग करणाऱ्यांनाही मोठा धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातानंतर रेस्क्यू टीमला बोलावण्यात आले होते. परंतु खोल दरीत कोसळल्याने रेस्क्यू टीमला अल-अब्सीचा मृतदेह आढळला असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर सोशल मीडियावर पुन्हा एकदा धोकादायक स्टंट आणि व्ह्यूज लाईक्ससाठी जीव धोक्यात घालण्याच्या प्रकारावर चर्चा सुरु झाली आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






