Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘Hayeeee असा TTE असेल तर…’, शताब्दी एक्स्प्रेसच्या TC ला पाहून मुलगी झाली फिदा, चोरून काढला व्हिडिओ, Video Viral

सोशल मीडियाच्या जगात, कोणी कधी व्हायरल होईल हे कोणालाच माहीत नसतं. ट्रेनमध्ये तिकीट तपासण्याचा एक साधा क्षण इंटरनेटवर एक नवीन क्रेझ बनला आहे! चक्क हँडसम TC व्हायरल होतोय, पहा व्हिडिओ

  • By दिपाली नाफडे
Updated On: Mar 23, 2026 | 10:48 AM
देखण्या TTE ला पाहून मुली केला कमेंट्सचा वर्षाव (फोटो सौजन्य - Instagram)

देखण्या TTE ला पाहून मुली केला कमेंट्सचा वर्षाव (फोटो सौजन्य - Instagram)

Follow Us
Follow Us:
  • शताब्दी एक्स्प्रेसमधील टीटीई व्हायरल
  • हँडसम टीसीला पाहून मुलगी फिदा 
  • इंटरनेटवर टीसीचा लुक बनला नवी क्रेझ 
ट्रेनने प्रवास करताना, तिकीट कन्फर्म झाले नसेल तर लोक अनेकदा टीटीईला टाळताना दिसतात. मात्र, एका देखण्या टीटीईच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वामुळे त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामुळे इन्स्टाग्रामवर फक्त या हँडसम टीसीचीच चर्चा आहे. मुली म्हणत आहेत, “माझ्याकडे असा तिकीट तपासनीस असता तर, मी रोज ट्रेनने प्रवास केला असता!” आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की या तिकीट तपासनीसमध्ये असं काय विशेष आहे? 

हा व्हिडिओ पहाल तर तुम्हालाही कळेल हा साधासुधा टीसी नाही तर इतका हँडसम टीसी आहे की तुमची नजरच हटणार नाही. एका मुलीने ट्रेनमधून प्रवास करताना या TTE चा व्हिडिओ काढला आणि पोस्ट केला. त्या TTE ला गोष्टीची कल्पनाही नाही आणि तो त्याचे काम इमाने इतबारे करत आहे. मात्र इंटरनेटवर हा व्हिडिओ आल्यानंतर मुलींनी एकच कल्ला केलेला दिसून येत आहे. सर्वच मुली ही नक्की कोणती ट्रेन आहे विचारत आहेत. 

काकांचा स्वॅगच वेगळा! बेबी डॉल गाण्यावर सिक्युरीटी गार्डचा भन्नाट डान्स ; नेटकरी झाले फिदा, Video Viral

देखण्या व्यक्तिमत्त्वामुळे लोक चकित!

या व्हायरल रीलमध्ये, हा टीटीई एसी कोचमध्ये तिकीट तपासताना दिसत आहे. तो अत्यंत सहजतेने आणि शांतपणे प्रवाशांची तिकिटे तपासत आहे. याचे चित्रीकरण याचवेळी करण्यात आले. या रीलच्या पार्श्वभूमीवर अरिजित सिंगचे ‘अखियां मिलावंगा’ (कमांडो ३) हे गाणे वाजत आहे, ज्यामुळे हा व्हिडिओ आणखी खास बनला आहे. या टीटीई रीलचे कॅप्शन आहे, “अरे! माझ्याकडे असा टीसी असता तर, मी रोज ट्रेनने प्रवास केला असता.”

युजर्सची प्रतिक्रिया 

या छोट्याशा रीलमुळे नेटवर मात्र कमालीची चर्चा सुरू झाली आहे. व्हिडिओमुळे सोशल मीडियावर हास्य, प्रेमप्रकरणे आणि टोमण्यांचे वादळ उठले आहे. एका युजरने लिहिले, “तिकीट खिडकीतून बाहेर फेकून दे, म्हणजे तो तुला पकडेल.” दुसऱ्याने गंमतीने म्हटले, “त्याची सरकारी नोकरी आहे, त्याला सुंदर बायको मिळेल, स्वप्न पाहू नका.” आणखी एकाने लिहिले, “दुसऱ्यांच्या भावांकडे, मुलांकडे किंवा बॉयफ्रेंडकडे एकटक पाहताना तुला लाज वाटत नाही का? पण खरं सांग बरं, ही ट्रेन कोणत्या मार्गावर आहे?”

काही जण तर इतके वेडे झाले की ते म्हणाले, “माझ्याकडे तिकीटसुद्धा नाही, कृपया मला पकडा!” एका युजरने त्या व्हिडिओवर दावा केला की तो तिकीट तपासनीस विवाहित होता, तर दुसऱ्याने गंमतीने म्हटले, “हे व्हायरल झाले आहे हे त्याला कळणारही नाही.” आणखी एकाने लिहिले, “ही शताब्दी आहे की वंदे भारत ट्रेन?”

एका रात्रीत होतात स्टार 

एकंदरीत, हा क्षण हेच दर्शवतो की कधीकधी आयुष्यातील अगदी लहान आणि सामान्य क्षणसुद्धा एखाद्याला रातोरात स्टार बनवू शकतात. हा तिकीट तपासनीस आता इंटरनेटचा नवा हिरो बनला आहे. हा व्हिडिओ कोणत्या ट्रेनमधील आहे हे अद्याप निश्चित झाले नसले तरी, त्याने सोशल मीडियावर नक्कीच धुमाकूळ घातला आहे. हा व्हिडिओ पोस्ट करताना वापरकर्त्याने #Shatabdi Express हा हॅशटॅग वापरला आहे. त्यामुळे ही ट्रेन शताब्दी एक्स्प्रेस असावी असा अनेकांचा अंदाज आहे. दरम्यान या TTE ची नक्की प्रतिक्रिया या व्हिडिओवर काय असणार हे मात्र अजून समोर आलेले नाही. 

वर्क फ्रॉम थिएटर! ‘धुरंधर 2’ सुरू असताना लॅपटॉपवर काम करताना दिसली महिला; नेटकरी म्हणाले, ‘कॉर्पोरेट मजदूर…’, VIDEO VIRAL

 

Web Title: Handsome tte goes viral becomes internet sensation video viral from shatabdi express

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2026 | 10:48 AM

Topics:  

  • train viral video
  • Video Viral
  • viral video

संबंधित बातम्या

VIDEO VIRAL: ‘त्यांचा इस्लामशी काहीही संबंध नाही’ पाकिस्तानी धर्मगुरूने हुथींना दहशतवादी तर बिन लादेनला म्हटले योद्धा
1

VIDEO VIRAL: ‘त्यांचा इस्लामशी काहीही संबंध नाही’ पाकिस्तानी धर्मगुरूने हुथींना दहशतवादी तर बिन लादेनला म्हटले योद्धा

हवेत कसरत करताना अचानक सुटली पकड! महिला कलाकाराचा भयंकर अपघात; VIDEO पाहून उडेल थरकाप
2

हवेत कसरत करताना अचानक सुटली पकड! महिला कलाकाराचा भयंकर अपघात; VIDEO पाहून उडेल थरकाप

‘सिंघम’ स्टाईलमध्ये पोलिसांची ॲक्शन! गुटखा तस्करांच्या कारच्या छतावर लटकत केला थरारक पाठलाग; Video Viral
3

‘सिंघम’ स्टाईलमध्ये पोलिसांची ॲक्शन! गुटखा तस्करांच्या कारच्या छतावर लटकत केला थरारक पाठलाग; Video Viral

‘मोदींकडे, योगींकडे की…’? Deepak Chahar च्या महागड्या तीन बॅट्स चोरीला, Video झाला Viral
4

‘मोदींकडे, योगींकडे की…’? Deepak Chahar च्या महागड्या तीन बॅट्स चोरीला, Video झाला Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.