
OYO हॉटेलमध्ये प्रियकरासोबत पकडली पत्नी; पती आणि सासूसोबत रस्त्यावरच सुरु झाला हायव्होल्टेज ड्रामा; Video Viral
काय घडलं व्हिडिओत?
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बुधवारी संध्याकाळी फरिदाबादच्या सेक्टर ३७ मधील एका ओयो हॉटेलमध्ये घडल्याचे सांगण्यात येत आहे. महिला आपल्या घरातून बाॅयफ्रेंडला भेटण्यासाठी हाॅटेलजवळ आली आणि इथेच तिला धक्कादायक सरप्राईज मिळालं. महिला प्रियकराला भेटायला जात आहे याची शंका येताच पती, ननंद आणि सासू तिच्या मागावर लागले. त्यांनी गुपचूप तिचा पाठलाग सुरु केला आणि हाॅटेलमध्येच महिलेची पोलखोल केली. हॉटेलमध्ये पोहोचल्यावर पतीची आई आणि नणंद थेट खोलीत गेल्या, जिथे त्यांनी त्या महिलेला तिच्या प्रियकरासोबत रंगेहाथ पकडले. त्यानंतर त्यांनी तिला ओढतच रुमच्या बाहेर काढले आणि रस्त्यावर त्यांचे भांडण सुरु झाले. दरम्यान या सगळ्यात प्रियकर मात्र तिथून पळ काढून निघून गेला.
व्हिडिओमध्ये सासू, सुन, ननंद आणि पती यांच्यात हाय व्होल्टेज ड्रामा रंगल्याचे दिसते. सासू सुनेला ओढत घेऊन जात असते तर सुन तिला सोडून देण्याची विनंती करत असते. हा ड्रामा पाहण्यासाठी रस्त्यावर मोठी गर्दी जमल्याचेही व्हिडिओत दिसते. नक्की काय घडलं हे पाहण्यासाठी लोक वर्तुळ करुन उभे असतात. यातील काहीजण कुटुंबाचा हा हाय व्होल्टेज ड्रामा आपल्या फोनच्या कॅमेरात कैद करतानाही दिसतात.
A married woman was allegedly caught with another man at an OYO hotel in Sector 37, Faridabad, after her husband and family confronted them. pic.twitter.com/zzmF8XPdGR — Pankaj (@Ragepkj) July 16, 2026
दरम्यान या घटनेचा व्हिडिओ इंटरनेटवर शेअर होताच यूजर्सने महिलेवर टिका करायला सुरुवात केली आहे. काहींनी महिलेच्या अफेअरवर टिका व्यक्त केली तर काहींनी संपूर्ण घटना समजल्याशिवाय महिलेवर आरोप लावणे चुकीचे आहेत असं म्हटलं. घटनेचा व्हिडिओ @Ragepkj नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला चांगलेच व्ह्यूज मिळाले असून अनेक यूजर्सने कमेंट सेक्शनमध्ये घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यात एका यूजरने म्हटले की, “यातही नुकसान पुरुषाचे आहे, आता ती त्याच्या संपत्तीमधील अर्धा हिस्सा मागेल”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “निर्लज्ज बाई, म्हणूनच आम्हाला भारतात लिंग-निरपेक्ष कायदे आणि पुरुषांसाठी राष्ट्रीय आयोग हवा आहे”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “घटस्फोटाच्या वेळी पतीने पोटगी देण्याऐवजी तिच्यासारख्या महिलांनीच ती दिली पाहिजे. फसवणूक करणे हा तिचा स्वतःचा निर्णय आहे. तिने जबाबदारी स्वीकारून, पतीने वाया घालवलेली वर्षे आणि दिलेल्या सर्व खोट्या आश्वासनांची भरपाई केली पाहिजे.”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.