(फोटो सौजन्य: X)
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओतील ही घटना उत्तर प्रदेशातील मऊ जिल्ह्यात घडून आल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात दिसते की, एका एटीयममध्ये एक व्यक्ती जमिनीवर पडला आहे. सुरुवातीला त्याला काही झालं की काय असं वाटतं पण काहीच वेळात समजतं की एसीची थंड हवा खाण्यासाठी तो एटीयममध्ये वामकुक्षी घेत असतो. हे दृष्य पाहून तिथून जाणारा एक व्यक्ती थक्क होतो आणि आपल्या फोनच्या कॅमेरात तो या दृष्यांना कैद करतो. घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर होताच व्हायरल होतो. अनेकांना तरुणाचा हा जुगाड पाहून हसू अनावर झालं आहे. काहींनी तरुणाच्या जुगाडावर आपले मत देखील व्यक्त केले आहे. यात काहींनी या जुगाडाचे समर्थन करत मिश्किल प्रतिक्रिया व्यक्त केल्या तर काहींनी तरुणाचे वागणे अत्यंत चुकीचे आहे असं म्हणत घटनेवर आपली टीका व्यक्त केली.
दरम्यान या घटनेचा व्हिडिओ @Shahnawazreport नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेची माहिती देत लिहिण्यात आलं आहे की, ‘उकाड्यापासून वाचण्यासाठी एका माणसाने एसबीआय (स्टेट बँक ऑफ इंडिया) एटीएमच्या केबिनलाच आपले घर बनवले. प्रचंड उकाडा होता आणि त्याच्या घरी एअर कंडिशनर नव्हते, म्हणून तो वातानुकूलित एटीएम केबिनमध्ये आडवा झाला. हा फोटो उत्तर प्रदेशातील मऊ जिल्ह्यातील आहे’.
उमस भरी गर्मी से बचने के लिए एक शख्स SBI (भारतीय स्टेट बैंक) के ATM केबिन को ही आशियाना बना लिया। गर्मी ज्यादा थी, घर में AC था नहीं लिहाजा भाई साहब लेट लिए ATM के वातानुकूलित केबिन में। ये तस्वीर यूपी के जिला मऊ की है। pic.twitter.com/18cL5QEmuL — Shahnawaz(News24) (@Shahnawazreport) July 17, 2026
व्हिडिओला चांगलेच व्ह्यूज मिळाले असून अनेक यूजर्सने कमेंट सेक्शनमध्ये घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यात एका यूजरने म्हटले की, “सत्य खूप कठोर आहे. ही केवळ एका व्यक्तीची कहाणी नाही, तर आपल्या समाजातील एका मोठ्या वर्गाचे हे चित्र आहे, जिथे आजही मूलभूत सुविधा (जसे की उकाड्यापासून थोडा दिलासा) सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर आहेत. असहाय्यतेला कोणताही निवारा नाही”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “कोणालाही अशा तीव्र उष्णतेपासून सुटका मिळवण्यासाठी शोधाशोध करावी लागू नये”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “त्याच्या वागणूकीने त्याला बरं वाटेल पण इतरांना त्रास होईल”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






