
Indurikar Maharaj Daughter: “नाचू किती नाचू किती…” (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
द लोकार्थ नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर झाला आहे. व्हिडीओमध्ये इंदुरीकर महाराजांची मुलगी डान्स करताना दिसतेय. बॅकग्राउंडला “नाचू किती नाचू किती, कंबर लचकली…” या गाण्याच्या ताल धरत मस्त डान्स करतीये. तिच्या डान्समध्ये एक वेगळाच उत्साह,आत्मविश्वास पाहायला मिळत आहे. बघायला गेलं तर हा एक साधा डान्स आहे मात्र इंदुरीकर महाराजांची मुलगी असल्याने व्हिडीओ चर्चा होत आहे. महाराज नेहमी कीर्तनातून लोकांना ज्ञान देतात, परंपरेबद्दल बोलतात. त्यामुळे त्यांच्या मुलीने असा मॉडर्न गाण्यावर डान्स करणं लोकांसाठी चर्चेचा विषय बनला आहे. Indurikar Maharaj Daughter:
व्हिडीओ समोर येताच नेटकऱ्यांनी कमेंटचा पाऊस पाडला आहे. कोणी तिच्या डान्सचं कौतुक केल जातंय, तर कोणी मजेशीर कमेंट करतंय. एकाने लिहिलंय, “महाराजांची मुलगी पण भारीच!” तर दुसरा म्हणतोय, “डान्स एकदम कडक.” काही जणांनी तर तिला ट्रोल पण करायचा प्रयत्न केला आहे, पण जास्त लोकांनी तिच्या डान्सला पॉझिटिव्ह प्रतिसाद दिला आहे.
तिचा आत्मविश्वास आणि एनर्जी सगळ्यांना आवडली आहे.सध्या इंस्टाग्राम, फेसबुकवर सगळीकडे हाच व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हॉट्सअॅप ग्रुपवर पण हाच व्हिडीओ शेअर केला जातो. इंदुरीकर महाराजांचे चाहते त्यांच्या कुटुंबावर पण तितकंच प्रेम करतात. त्यामुळे त्यांच्या मुलीचा व्हिडीओ आला की लोक उत्सुकतेने बघतात. या व्हिडीओमुळे पुन्हा एकदा इंदुरीकर महाराज चर्चेत आले आहेत.
मुलीने आपल्या डान्सने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. गाण्याची निवड, तिचा डान्सचा अंदाज सगळंच लोकांना आवडतंय.सोशल मीडियाचा जमाना आहे, इथे कोणाचा व्हिडीओ कधी व्हायरल होईल सांगता येत नाही. या मुलीच्या बाबतीत पण तेच झालं आहे. साधा डान्स व्हिडीओ होता पण आता लाखो लोकांनी तो बघितला आहे.