
CNG स्टेशनवर गॅस भरताना पाइप अचानक फुटला; २४ वर्षीय कर्माचाऱ्याचा जागीच मृत्यू; घटनेचा Live Video Viral
पेट्रोल पंपावर कर्मचाऱ्यासोबत घडले भलतेच
तुषार सुरुवातीपासून पेट्रोल पंपावर गाड्यांमध्ये सीएनजी भरण्याचे काम करत होता. घटनेच्या दिवशीही त्याने गाडीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी नोझल बाहेर काढले आणि गाडीत लावले. सर्वकाही सुरळीत सुरु होत, पण अचानक गॅसच्या प्रचंड दाबामुळे गाडीतून पाईप उडून पंपावर हवेतच इकडे तिकडे उडू लागला. यामुळे घटनास्थळी गोंधळ उडाला आणि सर्वजण आपला जीव वाचवण्यासाठी पळापळी करु लागले. तुषार मात्र पळत असताना हा नोझल त्याच्या डोक्यावर येऊन आदळला. डोक्याला मार लागल्याने तो जमिनीवर आदळला आणि यातच पुढे त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे सीएनजी स्टेशनवरील कर्मचारी आणि सामान्य जनतेच्या सुरक्षेबद्दल गंभीर उपस्थित केले जात आहेत.
Life of a common citizen holds no value in this country. 24-year-old CNG station employee Tushar Khamri died after a refueling hose burst and its nozzle struck him on the head at a petrol pump on the Sakchi-Kalimati road in Jamshedpur district of Jharkhand. Imagine the kind of… pic.twitter.com/pHbgDJMjiP — NCMIndia Council For Men Affairs (@NCMIndiaa) September 1, 2026
घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी आपला तपास सुरु केला. जवळील सीसीटीव्ही कॅमेरात घटना कैद झाल्याने घटना अपघाती असल्याचा पुरावा पोलिसांना पुरावा. या घटनेमुळे तुषारच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. घटनेचे फुटेज @NCMIndiaa नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आले. अनेक यूजर्सने व्हिडिओवर कमेंट्स करत घटनेवर आपले मत व्यक्त केले असून एका यूजरने म्हटले की, “हे माझ्या शहरातील आहे.खूपच हृदयद्रावक ”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “दुर्दैवी आणि हृदयद्रावक. सीएनजी भरताना जवळ उभे न राहण्याबाबत इतरांसाठी हा एक धडा आहे”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “इतके लोक पंपाजवळ का बसले आहेत? ते खूप धोकादायक आहे”.
टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.