LPG गॅससाठी बाईच्या अंगात आलं वारं...! क्षणार्धात हावभाव बदलले अन्..; Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मध्य प्रदेशात गॅसची टंचाई निर्माण झाली असून एका महिलेने तीव्र संताप आणि निराश व्यक्त केली आहे. अनेक वेळा गॅस एजन्सीचे चकरा मारुनही तिला सिलेंडर मिळालेला नाही. यामुळे महिलेने मोठ्या मोठ्याने ओरडण्यास सुरुवात केली आहे. हे पाहून तिच्या अंगात माता आली असल्याचे लोकांचे म्हणणे आहे.
याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, महिला एजन्सीच्या गेटला धरुन उभी आहे. ती कर्मचाऱ्यांकडे गॅस सिलेंडरची मागणी करतआ आहे. जीभ बाहेर काढून ओरड आहे. भयानक आवाज काढत आहे. आसपास लोक हे पाहून तिच्या माता आली म्हणत तिला शांत करण्याचा प्रयत्न करत आहे. पण महिलेचा राग काही कमी होईना. पण असे करुनही तिला सिलेंडर मिळाले नाही. महिलेला रिकाम्या हाताने परत जावे लागले आहे.
इकडे LPG साठी रांगा अन् तिकडे सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस; पाहून हसून हसून पोट दुखेल
गैस नही मिली तो आ गयी “मैया” #मध्यप्रदेश के मुरैना में एक महिला को LPG नही मिली. महिला नाराज हो गयी और फिर जीभ बाहर निकालकर “मां महाकाली के स्वरूप” में उसने गैस ऐजेंसी के सामने प्रदर्शन किया. महिला को सिलेंडर देकर विदा किया गया.#HimantaOnceAgain pic.twitter.com/Pgkbnv5rYR — M.H.Ansari❤️🇮🇳 (@hai_mahmoodul) March 15, 2026
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत. प्रशासनाने प्रतिक्रिया दिली आहे की, बुकिंग करताना तांत्रिक अडचणी झाल्यामुळे तिला गॅस सिलेंडर मिळाला नव्हता. परंतु या व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड खळबळ माजली आहे.
युद्धामुळे सामान्यांची उडाली धांदल; LPG गॅस सिलेंडर घेऊन पळू लागले लोक; VIDEO VIRAL
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






