Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

माकडाला पकडायला गेला अन् आयुष्य गमावून बसला… शॉक लागताच शरीर जळालं, हाॅटेल परिसरातील धक्कादायक घटनेचा Video Viral

Accident Viral Video : एक चूकी अन् जीवाला मूकला...! माकडाला पकडायला गेला खरा पण तितक्यातच विजेचा झटका बसला अन् तरुण जागीच मृत्यूमुखी पडला. संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुडेज आता इंटरनेटवर व्हायरल झाले आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 19, 2026 | 09:31 AM
माकडाला पकडायला गेला अन् स्वत:चच आयुष्य गमवून बसला... शॉक लागताच शरीर जळालं, हाॅटेल परिसरातील धक्कादायक घटनेचा Video Viral

माकडाला पकडायला गेला अन् स्वत:चच आयुष्य गमवून बसला... शॉक लागताच शरीर जळालं, हाॅटेल परिसरातील धक्कादायक घटनेचा Video Viral

Follow Us
Follow Us:
  • मध्य प्रदेशातील खजुराहो येथे माकड पकडताना तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला.
  • लोखंडी रॉड उच्च-दाबाच्या तारेला लागल्याने भीषण अपघात घडला.
  • घटनेचा CCTV व्हिडिओ व्हायरल झाला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.
मध्ये प्रदेशातील खजूराहोमधून एक धक्कादायक आणि अत्यंत दुःखद घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. यात माकडाला पकडताना व्यक्तीसोबत एक भीषण घटना घडून आल्याचे दिसून आले. तरुण एका हाॅटेलमध्ये काम करत असून हाॅटेलच्या परिसरातच हा संपूर्ण प्रकार घडला. मंगळवारी संध्याकाळी ६ वाजताच्या सुमारास याचे फुटेज समोर आहे आणि काही वेळातच ही घटना सोशल मिडियावर व्हायरल झाली. व्हिडिओमध्ये दिसून आले की, माकडाला पकडण्यासाठी तरुण एक लोखंडी राॅड पकडून त्याचा पाठलाग करत आहे आणि याच वेळी विजेच्या तारेला राॅडचा स्पर्श होतो. यामुळे परिणामी तरुणाला जोरदार विजेचा झटका लागतो, ज्यानंतर काही सेकंदातच त्याचा जागीच मृत्यू होतो. या थरार घटनेचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे ज्यात तरुणाच्या मृत्यूची संपूर्ण घटना स्पष्ट दिसून येते.

रस्त्यावर बेशुद्ध पडलेल्या आईला वाचवण्यासाठी चिमुकल्याची धडपड, लोक तमाशा बघत राहिले पण एकानेही केली नाही मदत; Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना खजुराहो रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या ‘द खजुराहो हेरिटेज रिसॉर्ट’मध्ये घडली. मृताची ओळख प्रदीप रायकवार उर्फ ​​रिंकू अशी पटली असून, तो त्याच रिसॉर्टमध्ये काम करत होता. या तरुणाने केवळ पाच दिवसांपूर्वीच हॉटेलमध्ये कामाला सुरुवात केली होती आणि अशातच त्याच्यासोबत हा अपघात घडला. मुख्य म्हणजे यात त्याचा जीव पणाला लागला. घटनेच्या सासीटीव्ही फुटेजमध्ये दिसते की, रिसॉर्टच्या बागेत शिरलेल्या माकडाला घाबरवण्यासाठी प्रदीप एक लांब लोखंडी सळई घेऊन त्याच्या मागे जात होता. यादरम्यानच सळई वरील उच्च दाबाच्या तारेला धडकते ज्यामुळे एका मोठ्या स्फोटासह प्रदीपला जोरदार विजेचा झटका लागतो. या घटनेनंतर तो लगेच खाली पडतो आणि यातच त्याचा मृत्यू होतो. व्हिडिओमध्ये त्याचा आवाज ऐकून काही महिला कर्मचारी काय झालं ते पाहण्यासाठी बाहेर येताना दिसतात पण प्रदीपची अवस्था पाहून त्याही घाबरतात.

📍Chhatarpur, Madhya Pradesh: A hotel room boy, Pradeep Raikwar alias Ranu, came in contact with a 33 kV power line while trying to scare away a monkey with an iron pipe in the hotel premises, lost his life.pic.twitter.com/JR6Pc6QveP — Deadly Kalesh (@Deadlykalesh) April 15, 2026

मस्तीमस्तीच्या नादात अनर्थ घडला अन् दोन्ही मित्रांसोबत घडला जीवघेणा प्रकार, घटनेचा चित्तथरारक Video Viral

माहितीनुसार, घटनेची माहिती मिळताच बामिठा पोलीस ठाण्यातील पोलीस घटनास्थळी पोहचून त्यांनी तरुणाचा मृतदेह ताब्यात घेऊन त्याला शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. बुधवारी शवविच्छेदनानंतर त्या तरुणाचा मृतदेह त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. रिसॉर्टच्या छताजवळून जाणारी उच्च-दाबाची वाहिनी नियमांनुसार बसवण्यात आली होती की विभाग किंवा हॉटेल व्यवस्थापनाने निष्काळजीपणा केला होता, याचा सखोल तपास आता केला जात आहे. दरम्यान सदर घटनेचा हा व्हिडिओ @Deadlykalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Madhya pradesh shocking video attempt to chase away monkey ends in tragedy viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2026 | 09:29 AM

Topics:  

  • madhya pradesh
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

बापरे! तुरुंगात जाण्याच्या भितीने व्यक्तीने स्वत:ला जिवंतपणीच पुरले, घटनेने पोलिसही थक्क
1

बापरे! तुरुंगात जाण्याच्या भितीने व्यक्तीने स्वत:ला जिवंतपणीच पुरले, घटनेने पोलिसही थक्क

खोदकाम करताना मजुराला सापडली सुई टोचलेली बाहुली, खिळा काढताच म्हणाला, “कुणाची तरी मुक्तता झाली”; Video Viral
2

खोदकाम करताना मजुराला सापडली सुई टोचलेली बाहुली, खिळा काढताच म्हणाला, “कुणाची तरी मुक्तता झाली”; Video Viral

मुंबई लोकलमध्ये तृतीयपंथीयांचा धिंगाणा? प्रवाशाला लाथा-बुक्क्यांनी मारलं,साडी वर केली अन्….; Video Viral
3

मुंबई लोकलमध्ये तृतीयपंथीयांचा धिंगाणा? प्रवाशाला लाथा-बुक्क्यांनी मारलं,साडी वर केली अन्….; Video Viral

काका हवेत फायरिंग करायला गेले खरे पण बंदूक निघाली फुसकी; लोक म्हणाले, हा चायनीज नाही तर पाकिस्तानी माल
4

काका हवेत फायरिंग करायला गेले खरे पण बंदूक निघाली फुसकी; लोक म्हणाले, हा चायनीज नाही तर पाकिस्तानी माल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.