
पतीला दुसऱ्या महिलेसोबत नको त्या अवस्थेत पकडलं अन् पत्नीने केला हाय व्होल्टेज ड्रामा, एकामागून एक कानशिलात हाणली... Video Viral
आईनं लग्न ठरवलं अन् लेकीनं टक्कल केला? सोशल मीडियावर उडाला एकच गोंधळ, VIDEO तुफान व्हायरल
पतीने केली दुसऱ्या महिलेची फसवणूक
पतीच्या अफेअरची माहिती मिळताच पत्नीने साधारण ७० किलोमीटरपर्यंत पतीचा पाठलाग केला. हाॅटेलमध्ये दुसऱ्या महिलेसोबत रंगेहात पकडल्यानंतर तिने पतीला खेचतच रुममधून बाहेर काढलं आणि त्याला मारायला सुरुवात केली. इतकंच नाही तर ती पतीला घेऊन पोलिस ठाण्यातही पोहचली. पतीने २०२५ मध्ये कोर्ट मॅरेज करत पहिल्या पत्नीशी विवाह केला. दुसरी महिलेला तो इंस्टाग्रामवर भेटला. आपण अविवाहित आहोत असं खोट सांगत त्याने महिलेला आपल्या जाळ्यात अडकवलं.
रेवा येथील सामन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका हॉटेलमध्ये पत्नीने खोली उघडताच, तिला तिचा नवरा दुसऱ्या महिलेसोबत आढळला. यानंतर पत्नीचा राग अनावर झाला आणि तिने खोलित शिरुन दोघांनाही शिविगाळ करण्यास सुरुवात केली. पत्नीने पतीला मारहाण देखील केली. यानंतरही जेव्हा तिचा राग शांत झाला नाही तेव्हा काॅलर पकडत ती पतीला पोलिस ठाण्यात घेऊन गेली. पिडितेने पोलिसांना सांगितले की, ३ जुलै २०२५ रोजी दोघांनी कोर्ट मॅरेज केले. हे तिचे दुसरे लग्न होते आणि पहिल्या पतीपासून तिला एक मुलगा देखील आहे.
पत्नीने आरोप केला की, लग्नाच्या काही दिवसांनंंतरच पती अचानक गायब झाला आणि त्याने आपला मोबाईल नंबर देखील बदलला. महिलेला जेव्हा संशय आला तेव्हा तिने चाैकशी करत माहिती काढायला सुरुवात केली. यात तिला समजलं की, तिच्या पतीचे इतर महिलांसोबतही प्रेमसंबंध होते. दरम्यान हाॅटेलमध्ये पतीसोबत पकडली गेलेली महिला या सर्व ड्रामामुळे चांगलीच घाबरली. आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करत आहोत त्याचे आधीच लग्न झाले आहे याची माहिती तिला नव्हती. काही दिवसांपूर्वीच व्यक्तीने मंदिरात जाऊन तिच्या भांगेत सिंदूर भरले आणि लग्नाचे आश्वासन दिले. पहिल्या पत्नीने रंगेहात पकडल्यानंतर तिलाही धक्का बसला आणि ही महिला कोण आहे असा सवाल ती विचारु लागली.
Extra-Marital affair Kalesh (Rewa, MP: Wife chases husband 70km, catches him in hotel with another woman after July 2025 court marriage. Heated confrontation goes viral; husband wants divorce, second woman claims she didn’t know. Police investigating)
pic.twitter.com/J0uz7QqwnT — Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) July 14, 2026
पोलिसांचा तपास सुरु
रंगेहात पकडल्यानंतर पतीने आपल्या जबाबात फक्त इतकंच स्पष्ट केलं की, तो चुकून पकडला गेला. हाॅटेलमधील हाय व्होल्टेज ड्रामानंतर हे प्रकरण आता पोलिसांपर्यंत पोहचलं असून पत्नीच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी चाैकशीला सुरुवात केली आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.