आईनं लग्न ठरवलं अन् लेकीनं टक्कल केला? सोशल मीडियावर उडाला एकच गोंधळ, VIDEO तुफान व्हायरल (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक मुलगी खुर्चीवर बसलेली आहे. ती कोणत्याही संकोचाशिवाय नाव्ह्याकडून मुंडण करुन घेत आहे. तिचे लांडसडक आणि सुंदर केस पूर्णपणे काढून घेत आहे. तिच्या चेहऱ्यावर कोणतेही दु:ख नसून आनंद पाहायला मिळत आहे. या व्हिडिओवर POV : My Mom Planned Marrige.. असे कॅप्शन लिहिलेले आहे. परंतु यामागचे सत्य काही औरच आहे.
शादी से इनकार करने के बाद भी उसकी मां ने उसके लिए लड़के देखने शुरू कर दिए 🥶 जब शादी का दबाव लगातार बढ़ता गया तो इसने अपना पूरा सिर मुंडवा लिया ताकि उसे देखने आने वाले लड़के उसे पसंद ही न करें।pic.twitter.com/7SSfc3rWcR — JIMMY (@Jimmyy__02) July 13, 2026
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी मुलीने मनाविरुद्ध ठरवलेल्या लग्नाविरोधात धाडसी पाऊल उचलले असे म्हटले आहे, तर काहींनी आई-वडील कधी आपल्या मुलांचे ऐकणार असे म्हटले आहे. परंतु या व्हिडिओमागचं सत्य काही औरच आहे. या मुलीचे नाव कीर्तन मेनन असून तिने स्वत:च यामागचे खरे सत्य सांगितले आहे. तिने स्पष्ट केले आहे की, तिने कॅप्शन केवळ मज्जा म्हणून टाकले होते. तिने आपले केस दान केले असून पालकांची संमती देखील घेतली आहे. तिच्यावर लग्नासाठी घरच्यांनी कोणताही दबाव आणलेला नाही.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






