Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ट्रेनमध्ये चढताना आला हार्ट अटॅक, स्टेशनवरच पडला अन् तडफडतच गेला व्यक्तीचा जीव; मृत्यूचा थरारक Video Viral

Train Accident Video : रेल्वेसाठी धावला जीव पण ट्रेन थांबूनही त्यात चढता आले नाही. व्यक्तीच्या अकस्मात मृत्यूचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत असून लोकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 22, 2026 | 03:00 PM
ट्रेनमध्ये चढताना आला हार्ट अटॅक, स्टेशनवरच पडला अन् तडफडतच गेला व्यक्तीचा जीव; मृत्यूचा थरारक Video Viral

ट्रेनमध्ये चढताना आला हार्ट अटॅक, स्टेशनवरच पडला अन् तडफडतच गेला व्यक्तीचा जीव; मृत्यूचा थरारक Video Viral

Follow Us
Close
Follow Us:
  • रेल्वे स्थानकावर घडलेली एक धक्कादायक घटना सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
  • एका व्यक्तीला अचानक त्रास झाल्यानंतरही बराच वेळ कोणतीही मदत मिळाली नाही.
  • व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी माणुसकी आणि जागरूकतेबाबत प्रश्न उपस्थित केले.
आताच्या काळात कुणाच्याही जीवाची शाश्वती देता येत नाही. आज एखादा व्यक्ती जिवंत आहे तर उद्या तो दिसेलंच हे सांगता येत नाही. मृत्यूचे प्रमाण पाहता आजकाल अकस्मात मृत्यूंचे प्रमाण फार झपाट्याने वाढले आहे. अशीच एक घटना अलिकडे सोशल मिडियावर शेअर करण्यात आली आहे ज्यात रेल्वे स्टेशनवरील भीषण अपघाताचे दृष्य दिसून आले. घटना उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद जिल्ह्यातील टुंडला रेल्वे स्थानकावर घडून आली. ब्रह्मपुत्रा मेल पकडण्याच्या प्रयत्नात व्यक्तीने रेल्वेच्या दिशेने धाव घेतली आणि यात चढणार तितक्यातच त्याला मृत्यूने भेट दिली. तरुणाचे वय ५५ वर्षे होते आणि या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला. मुख्य म्हणजे व्यक्ती बराच काळ स्थानकावर पडला बेशुद्ध पडला होता पण याकाळात त्याला कुणीही मदतीचा हात दिला नाही. या घटनेचे सीसीटिव्ही फुटेज आता सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत आहे. चला घटनेविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

पेट्रोल पंपावर तरुणींचा राडा! आधी केस उपटले, एकमेकींना लाथा-बुक्क्यांनी मारलं; तेवढ्यात तिसऱ्याने…, Video Viral

नक्की काय घडलं?

मृत व्यक्तीचे नाव प्रीतम तिरवा असे असून तो मूळचा पश्चिम बंगालमधील दार्जिलिगचा रहिवाशी आहे. दिल्ली तो मोमोज विकण्याचा व्यावसाय करत होता. प्रीतम आपल्या पत्नी मोनिका रॉय यांच्यासोबत दिल्लीहून न्यू जलपाईगुडीला प्रवास करत होते. ट्रेनमधील प्रचंड गर्दीमुळे पती-पत्नी एकत्र चढू शकले नाही. पत्नी एसी डब्यात चढली तर पती जनरल डब्यात चढला. जेव्हा ट्रेन टुंडला स्टेशनवर थांबली, तेव्हा प्रीतम आपले सामान घेऊन जनरल डब्यातून बाहेर पडला आणि पत्नीला भेटण्यासाठी एसी डब्यात जाण्याचा प्रयत्न करू लागला. सीसीटिव्ही फुटेजमध्ये यापुढील दृष्य दिसून आले. यात आपण पाहू शकतो की, प्रीतम एसी कोचकडे जात आहे आणि यावेळीच ट्रेनच्या दरवाजाजवळ पोहचताच तो अचानक बेशुद्ध होतो आणि प्लॅटफाॅर्मवर पडतो. त्याला यावेळी हृदयविकाराचा झटका आल्या असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. बराच काळ मदत न मिळाल्याने प्रीतमचा जागीच मृत्यू झाला.

ट्रेन पकड़ने जा रहा था, जिंदगी छूट गई !! यूपी : फिरोजाबाद के टूंडला रेलवे स्टेशन पर ट्रेन में चढ़ने के दौरान एक व्यक्ति अचानक प्लेटफार्म पर गिरा। संभवतः हार्टअटैक आया था। उसके पैर प्लेटफार्म और ट्रेन के बीच खाली स्पेस में लटक गए। जैसे ही ट्रेन चली, वो घिसटता हुआ ट्रेन के नीचे… pic.twitter.com/9jKtXJy20U — Sachin Gupta (@Sachingupta) April 21, 2026

पोत्यात भरली पोरं अन् १० वर्षांच्या योजनेनंतर अखेर कुटुंबाने नार्थ कोरीयातून केले पलायान; स्वातंत्र्याची थरारक कहाणी

रेल्वे पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू केला आहे आणि सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. सदर घटनेचा व्हिडिओ @Sachingupta नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेची सविस्तर माहिती देण्यात आली असून अनेक यूजर्सने या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एका यूजरने म्हटले की, “ही एक अतिशय दुःखद घटना आहे. अशा वेळी, थोडीशी मदत आणि सावधगिरी बाळगल्याने कोणाचा तरी जीव वाचू शकला असता. माणुसकी दाखवणे हे सर्वात महत्त्वाचे आहे”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “थोडीशी मदत कोणाचा तरी जीव वाचवू शकते, म्हणून अशा वेळी मदत पुरवली पाहिजे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “हे खूप दुःखद आहे! लोकांनी इतके निर्दयी असायला नको”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Man collapses at station no one helps viral cctv footage gone viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2026 | 03:00 PM

Topics:  

  • heart attack
  • Indian Railways
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

Iceman Promo : ड्रेकचा ‘कूल’ स्टंट! भर उन्हात शहरात अवतरला हिमनग; बर्फ वितळताच आत मोठं सरप्राइज, पाहा VIDEO
1

Iceman Promo : ड्रेकचा ‘कूल’ स्टंट! भर उन्हात शहरात अवतरला हिमनग; बर्फ वितळताच आत मोठं सरप्राइज, पाहा VIDEO

कोटींची Porsche अन् बोनेटवर सीमेंट टाकले; तरुणाने पुढं जे केलं…, VIRAL VIDEO मुळे इंटरनेटवर खळबळ
2

कोटींची Porsche अन् बोनेटवर सीमेंट टाकले; तरुणाने पुढं जे केलं…, VIRAL VIDEO मुळे इंटरनेटवर खळबळ

VIRAL VIDEO: इराणचा ‘खोरमशहर’ प्रहार! क्षेपणास्त्रे घेऊन रिव्होल्यूशनरी गार्ड्स रस्त्यावर; ट्रम्पचा इशारा अन् अनपेक्षित सीझफायर
3

VIRAL VIDEO: इराणचा ‘खोरमशहर’ प्रहार! क्षेपणास्त्रे घेऊन रिव्होल्यूशनरी गार्ड्स रस्त्यावर; ट्रम्पचा इशारा अन् अनपेक्षित सीझफायर

पेट्रोल पंपावर तरुणींचा राडा! आधी केस उपटले, एकमेकींना लाथा-बुक्क्यांनी मारलं; तेवढ्यात तिसऱ्याने…, Video Viral
4

पेट्रोल पंपावर तरुणींचा राडा! आधी केस उपटले, एकमेकींना लाथा-बुक्क्यांनी मारलं; तेवढ्यात तिसऱ्याने…, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.