गणेशोत्सवाच्या उत्साहात सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे. आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनानिमित्त प्रत्येकजण पारंपरिक वेशभूषेत दिसत आहे. याच गणेशोत्सवानिमित्त, आपली मराठमोळी अप्सरा, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने देखील खास पारंपरिक लूक केला आहे. तिने सोशल मीडियावर साडीतील काही सुंदर फोटो शेअर केले आहेत, ज्यावर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
सोनालीने गणेशोत्सवनिमित्त सोशल मीडियावर खास फोटो शेअर केले आहे.
यात तिने साडीचा पदर घेऊन एक सुंदर पोझ दिली आहे.
तिच्या पारंपरिक सिंपल दागिन्यांनी तिचा लूक पूर्ण केला आहे.
या मराठमोळ्या लूकमध्ये सोनालीचं सौंदर्य आणखी खुलून दिसत आहे.
सोनालीच्या चेहऱ्यावरील तेजस्वी सौंदर्य आणि डोळ्यातील तेज स्पष्ट दिसत आहे.