Photo Credit- X
NARI-2025 Report: दिल्ली-कोलकाता-जयपूर नाही, तर देशातील काही इतर शहरे महिलांसाठी सर्वात सुरक्षित ठरली आहेत. NARI (National Assessment Report for Indian women) च्या २०२५ च्या अहवालातून हे धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत. या अहवालानुसार, भारतातील शहरी भागांमध्ये जवळपास ४०% महिला स्वतःला सुरक्षित मानत नाहीत. ३१ शहरांमधील १२,७७० महिलांच्या मतांवर आधारित हा अहवाल महिला सुरक्षेची गंभीर स्थिती दर्शवतो.
NARI २०२५ च्या अहवालानुसार, २०२४ मध्ये ७% महिलांनी त्यांना होणाऱ्या अत्याचाराचा अनुभव सांगितला. यामध्ये डोळे वटारून पाहणे, छेडछाड करणे, अश्लील टिप्पणी आणि रस्त्यांवर स्पर्श करणे यांसारख्या घटनांचा समावेश आहे. १८ ते २४ वयोगटातील तरुणींना सुरक्षेच्या दृष्टीने सर्वाधिक धोका असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्युरो (NCRB) च्या २०२१ च्या आकडेवारीनुसार, महिलांवरील गुन्ह्यांच्या नोंदणीकृत प्रकरणांपेक्षा हा आकडा १०० पट जास्त आहे. महिलांनी या अत्याचारांसाठी अपुरे पायाभूत सुविधा, कमी प्रकाश आणि सार्वजनिक वाहतुकीची अकार्यक्षम व्यवस्था यांना जबाबदार धरले आहे.
KOHIMA, the capital of NAGALAND, has been ranked among the safest cities for women in India by the National Annual Report & Index on Women’s Safety (NARI) 2025.
With its historic charm, scenic views, vibrant cafés, iconic festivals and warm hospitality, Kohima is more than a… pic.twitter.com/qXLdE1STeY
— abu metha (@abumetha) August 28, 2025
या अहवालात कोहिमा, विशाखापट्टणम, भुवनेश्वर, ऐझॉल, गंगटोक, इटानगर, आणि मुंबई ही शहरे राष्ट्रीय सुरक्षा क्रमवारीत सर्वात पुढे आहेत, तर रांची, श्रीनगर, कोलकाता, दिल्ली, फरीदाबाद, पटना आणि जयपूर ही शहरे महिलांसाठी कमी सुरक्षित मानली गेली आहेत.
सर्वेक्षण केलेल्या महिलांपैकी केवळ २२% महिलांनीच त्यांच्यासोबत घडलेल्या घटनांची माहिती प्रशासनाला दिली. याव्यतिरिक्त, ५३% महिलांना त्यांच्या कार्यस्थळी लैंगिक छळ प्रतिबंध (POSH) धोरण आहे की नाही याची माहिती नव्हती, जे कायद्यानुसार अनिवार्य आहे.
अहवालात ६९% महिलांनी सध्याचे सुरक्षा प्रयत्न काही प्रमाणात पुरेसे असल्याचे सांगितले, तर ३०% पेक्षा जास्त महिलांनी यामध्ये मोठी कमतरता असल्याचे नमूद केले. २०२३-२०२४ दरम्यान केवळ ६५% महिलांनी वास्तविक सुधारणांची अपेक्षा व्यक्त केली. राष्ट्रीय महिला आयोगाच्या (NCW) अध्यक्षा विजया रहाटकर यांनी अहवाल सादर करताना सांगितले की, महिला सुरक्षा केवळ कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा नाही, तर तो त्यांच्या शिक्षण, आरोग्य, नोकरीच्या संधी आणि स्वातंत्र्यासारख्या जीवनातील प्रत्येक पैलूवर परिणाम करतो.