हीच खरी माणुसकी! जखमी श्वानाला खाद्यांवर घेऊन डोंगरातून 'असं' केलं रेसक्यू; नेटकऱ्यांकडून भरभरुन कौतुक, Video Viral ( फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
अलीकडच्या काळात लोक अनेकदा जखमी व्यक्तींनाही मदत करत नाही. अशा जगात एका व्यक्तीने प्राण्याच्या रक्षणासाठी स्वत:च्या सुरक्षेचीही पर्वा केली नाही. रस्त्याच्या कडेला जखमी अवस्थेत सापडलेल्या कुत्र्याला एका व्यक्तीने खाद्यांवर घेत पर्वतांमधून चढाई केली आहे. या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, दोन लोक श्वानाला घेऊन चालले आहे. एका व्यक्तीच्या पाठीवर एक टोपली असून त्या टोपलीत श्वानाला बसवले आहे. आपल्या पाठीवर टोपली लादून त्याला घेऊन जात आहे. चढण्यासाठी पायऱ्या अगदी छोट्या आहेत. परंतु व्यक्तीने कोणतीही तक्रार न करता श्वानाला वाचवले आहे. हा व्हिडिओ सध्या अनेकांच्या पसंतीस पडत आहे.
उसाचा रस थेट सातासमुद्रापार पोहोचला; एका ग्लासची किंमत ऐकून व्हाल थक्क, VIDEO VIRAL
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @adultsociety या अकाउंटवर शेअर करुन याची माहिती देण्यात आली आहे. या व्हिडिओला आतपर्यंत हजारो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहे. अनेकांनी यावर हार्टचे इमोजी कमेंट केले आहेत. एका नेटकऱ्याने देव तुमचे भले करो असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने नाहीतर, आजकाल लोक माणसांचीही पर्वा करत नाहीत असे म्हटले आहे. हा व्हिडिओ सध्या श्वानप्रेमींच्या पसंतीस पडत आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






