अंगावर काटा आणणारा व्हिडिओ! ट्रेन येताच रेल्वे ट्रॅकवर झोपला पठ्ठ्या; अंगवारुन गाडी गेली अन्..., Video Viral (फोटो सौजन्य: व्हिडिओ स्क्रीनशॉट)
Shocking Viral Video : सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामध्ये कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ पाहायला मिळतात. स्टंट, जुगाड, भांडण यांसारखे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळतात. सध्या एक भयावह व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका व्यक्तीने ट्रेन येताच असे काही केलं आहे की पाहून तुमचीही झोपच उडेल. या भयावह व्हिडिओने अनेकांचा थरकाप उडाला आहे. हा व्हिडिओ सध्या वेगाने व्हायरल होत आहे.
नेमकं काय घडलं?
व्हायरल होत असलेला व्हिडिओ ट्रेनच्या कॉकपिटमधून काढण्यात आला आहे. कदाचित हा व्हिडिओ कॉकपिटमधील सीसीटीव्ही फुटेज असावा. यामध्ये तुम्ही पाहू शकता की, रात्रीची वेळ आहे. ट्रेन जोरात वाऱ्याच्या वेगाने पळत आहे. आसपास सर्व सुनसान आहे. याच वेळी एका ठिकाणी अचानक एक माणूस ट्रेनसमोर येतो आणि ट्रॅकवर झोपतो.
लोको पायलटला काही समजायच्या आतच माणसाच्या अंगावरुन ट्रेन जाते. सध्या ही घटना नेमकी कुठे घडली? त्या माणसाचे पुढं काय झालं याबाबत कोणतीही माहिती नाही. पण हा व्हिडिओ पाहून अनेकांच्या हार्ट बीट्सच थांबल्या आहेत. ही घटना अशी घडली की व्यक्तीला वाचवण्याची संधी देखील लोको पायलटकडे नव्हती.
व्हायरल व्हिडिओ
pic.twitter.com/pmZ04Nsptl — Brutal Clips Only 🚯 (@BrutalsOnly) November 15, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @BrutalsOnly या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. अनेकांनी त्या व्यक्तीबद्दल विचारले आहे. तर काहींनी व्यक्तीने स्वत:चा जीव घेतला असणार असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. पाहणाऱ्यांनी तर श्वास रोखून धरला आहे. अनेक वेळा काही लोक असे स्टंट करत असतात. असेही काहींचे म्हणणे आहे.
स्वच्छता कर्मचारीसमोर तरुणाचं ‘ते’ अश्लील कृत्य; संतापून महिलेनं झाडूनं धु, धु, धुतलं, Video Viral
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






