Meloni Daughter Viral Video : आईचा हात घट्ट धरुन उभी राहिली जिनेव्रा; G7 परिषदेतील मेलोनींच्या लेकीचा गोंडस क्षण व्हायरल (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
जिनेव्रा १० वर्षांची असून ती आपल्या आईसोबत म्हणजेच पंतप्रधान जॉर्जिया मेलोनींसोबत G7 परिषदेला आली होती. परिषदेत उपस्थित असलेल्या माध्यमांच्या गर्दीमुळे ती अस्वस्थ झाल्याचे दिसून आले. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की ती आपल्या आईचा हात घट्ट पकडून आहे. कॅमेरापासून लपण्यासाठी ती आईच्या मागे लपत आहे.
जगभरातील प्रभावशाली नेते फ्रान्समध्ये जमले असताना जिनेव्राच्या या साध्या आणि निरागस वागण्याने लोकांचे लक्ष वेधले आहे. तिचे जगभरातील लोकांकडून कौतुक होत आहे. या बोलताना सोशल मीडिया काही नेटकऱ्यांनी इतक्या कॅमऱ्यांसमोर तिचे असे वागणे साहजिक असल्याचे म्हटले आहे. तर अनेकांनी ती एका सामान्य मुलीसारखीच वागत असल्याचे म्हटले आहे.
१५ ते १७ जून दरम्यान G7 परिषदेत अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, इटली, ब्रिटन, जपान आणि कॅनडा या देशांचे नेते सहभागी झाले होते. तसेच या परिषदेला युरोपियन युनियनचे प्रतिनिधी देखील उपस्थित होते. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील या परिषदेचे आमंत्रण देण्यात आले होते. मात्र, जागतिक घडामोडींवरील चर्चेंइतकेच जिनेव्राच्या निरागसतेची चर्चा सर्वत्र रंगली आहे.
जॉर्जिया मेलोनी अनेक वेळा आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये आपल्या मुलीसोबत दिसून आल्या आहेत. यावेळी त्या जिनेव्रासोबत आपल्या होता. पण जिनेव्राने कोणताही दिखावा न करता एका सामान्य मुलीप्रमाणाने वागू सर्वांचे मन जिंकले असे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.
Giorgia Meloni’s daughter steals the spotlight by avoiding it Italy’s PM’s shy sidekick goes viral for hiding behind her mom as they arrive at the G7 summit in Geneva pic.twitter.com/n8gmg93Cfi — RT (@RT_com) June 17, 2026
France Supports India : UNSC सुधारणांवर फ्रान्स ठाम; भारताला स्थायी सदस्यत्व देण्याची मागणी






