Pahalgam Terror Attack: काश्मीरच्या हृदयात भारत आहे की पाकिस्तान? स्थानिक महिलेनेच केला खुलासा; Video Viral
जम्मू काश्मीरमधील पेहेलगाम ठिकाणी २२ फेब्रुवारी २०२५ रोजी दहशवादी हल्ला करण्यात आला. यात २६ हुन अधिक लोकांचा मृत्यू झाला तर अनेकजण गंभीर जखमी झाले. या हल्ल्याने संपूर्ण जग हादरलं. याचे अनेक व्हिडिओ तसेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि अजूनही होत आहेत. यातच आता काश्मीरमधील आणखीन एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे जो तेथील एका स्थानिक महिलेचा आहे. व्हिडिओमध्ये महिलेने एक धक्कादायक दावा केला आहे जो पाहून सर्वचजण आवाक् झाले. या व्हिडिओ आता सोशल मीडियावर वेगाने शेअर केला जात आहे.
बंद खोलीत मुलांनी सुरु केला मृत्यूचा खेळ! दृश्य पाहून वाटेल… घेतील थेट यमराजांचीच भेट; Video Viral
काय घडले व्हिडिओत?
काश्मीरमधील एका महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये काश्मीरमधील बहुतेक मुस्लिम मनापासून पाकिस्तानला आपले मानतात असा दावा करण्यात आला आहे. ज्यामुळे आता हा व्हिडिओ वेगाने चर्चेचा विषय बनत आहे. ती महिला म्हणते की ती भारतात राहत असली तरी पाकिस्तान तिच्या हृदयात राहतो. ती म्हणाले की, काश्मीरमधील लोक पाकिस्तानी लोकांना त्यांचे खरे भाऊ आणि बहिणी मानतात आणि तिथेच त्यांना आपलेपणाची भावना जाणवते.
लक्ष वेधून घेणाऱ्या व्हिडिओमध्ये, एक पुरूष महिलेला विचारताना दिसतो की काश्मीरचे लोक भारताला स्वतःचे मानतात की पाकिस्तानला? यावर उत्तर देताना त्या महिलेने सांगितले की पाकिस्तान तिच्या हृदयात राहतो. काश्मीरमध्ये राहणाऱ्या बहुतेक मुस्लिमांच्या हृदयात पाकिस्तान आहे. जेव्हा त्या महिलेला विचारण्यात आले की ती भारतात राहते, तेव्हा तिने सांगितले की हिंदू आणि मुस्लिम हे भाऊ आहेत पण पाकिस्तानातील मुस्लिम तिचे खरे भाऊ आहेत. ती मनापासून फक्त पाकिस्तानलाच आपले मानते.
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोक संतापले. अनेक युजर्सने महिलेच्या विधानाला देशद्रोही म्हटले. काहींनी अशा विचारांचा काश्मीरच्या नवीन पिढीवर काय परिणाम होऊ शकतो याबद्दल चिंता व्यक्त केली. हा व्हायरल व्हिडिओ @indiaanbhai नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले, “श्रीनगरमध्ये काश्मीरला माल पुरवठा करणे बंद करा, त्यांना शुद्धीवर येईल, त्यांचा बाप कोण आहे?” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “पाकिस्तानमध्ये निघून जावे, भारताचे काश्मीर रिकामे करावे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.