(फोटो सौजन्य – Instagram)
सोशल मीडिया एक असे प्लॅटफॉर्म आहे जिथे नेहमीच अनेक धक्कादायक गोष्टी व्हायरल होत असतात. यातील प्रकार इतके अजब-गजब असतात की त्यातील दृश्य पाहून आपल्याला आश्चर्याचा धक्काच मिळेल. आताही इथे असाच एक अनोखा प्रकार व्हायरल झाला आहे, ज्यातील दृश्ये तुमच्या कल्पनेपलीकडचे आहेत. या व्हिडिओ एका मुंगी संबंधित असून यात ती चक्क चोरी करताना दिसून आली. आता तुम्हाला वाटेल की, इवलीशी मुंगी चोरून चोरून काय चोरणार मात्र यात मुंगी कोणती साधी सुधी गोष्ट चोरत नसून लाखोंचा हिरा चोरताना दिसून आली. होय, तुम्हाला खोटं वाटेल पण सत्यात असे घडले आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा भयानक Photo Viral; जिकडे तिकडे मृतांचा सडा अन् काय आहे मूळ सत्य?
काय दिसले व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, मुंगी आपल्या ताकदीने हिऱ्याला ओढत ओढत घेऊन जात आहे. सुरुवातीला कारखान्यात उपस्थित असलेले लोक हे दृश्य पाहून थक्क झाले, पण नंतर या छोट्या चोराची ताकद आणि हुशारी पाहून कुणालाही हसू आवरता आले नाही. हा व्हिडिओ इंटरनेटवर इतका व्हायरल झाला की हजारो लोकांनी तो पाहिला आणि शेअर केला. काही लोकांना ते मजेदार वाटले तर अनेकांनी मुंगीच्या ताकदीचे आणि मेहनतीचे कौतुक केले. मुंगी जो हिरा घेऊन जात होती तो हा हिरा लाखोंचा असल्याचे व्हिडिओमध्ये सांगण्यात आले आहे. मात्र मुंगीला हा हिरा काही पळवता आला नाही आणि तिची चोरी क्षणातच पकडली गेली.
व्हिडिओतील ही दृश्य मजेदार असून लोक त्यांचा आनंद लुटताना दिसून येत आहेत. हा व्हिडिओ @log.kya.sochenge नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले असून अनेक युजर्सने व्हिडिओवर कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “प्रशिक्षणानंतर या मुंगीला इंग्लंडला पाठवण्यात यावं” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “त्याला त्याच्या राणीला इम्प्रेस करायचे आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.