Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काल्पनिक की खरं सत्य? रंगीत नाही, मोराचा पांढराशुभ्र पिसारा… राष्ट्रीय प्राण्याचे अद्भूत रुप पाहून यूजर्स घायाळ; Video Viral

White Peacock Viral Video : अतिसुंदर! तुम्ही कधी पांढऱ्याशुभ्र रंगाचा मोर पाहिला आहे का? त्याने आपला सुंदर पिसारा खुलवला आणि पाहणारे त्याच्या रुपावर घायाळच झाले. मोराचे दुर्लभ रुप आता सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: May 30, 2026 | 11:43 AM
काल्पनिक की खरं सत्य? रंगीत नाही, मोराचा पांढराशुभ्र पिसारा... राष्ट्रीय प्राण्याचे अद्भूत रुप पाहून यूजर्स घायाळ; Video Viral

काल्पनिक की खरं सत्य? रंगीत नाही, मोराचा पांढराशुभ्र पिसारा... राष्ट्रीय प्राण्याचे अद्भूत रुप पाहून यूजर्स घायाळ; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या एका दुर्मिळ पक्ष्याच्या व्हिडिओने नेटकऱ्यांना मंत्रमुग्ध केले आहे.
  • अनोख्या रंगरूपामुळे अनेकांनी या दृश्यांच्या सत्यतेवर प्रश्न उपस्थित केले.
  • व्हिडिओ पाहिल्यानंतर यूजर्सनी त्याच्या सौंदर्याचे भरभरून कौतुक करत प्रतिक्रिया दिल्या.
भारताचा राष्ट्रीय प्राणी मोर तर आपल्या सर्वांना ठाऊकच आहे. आपल्या अद्भूत आणि रंगीबेरंगी साैंदर्यासाठी मोर ओळखला जातो. त्याचा मधुर आवाज आणि सुंदर डान्स पाहायला मिळणे म्हणजे भाग्यच जणू. हा प्राणी अधिकतरवेळी जंगलात किंवा अरण्यात आढळून येतो. याच्या रुपाचे वर्णन करायला सांगितले तर आपल्याला त्याचा हिरवा, निळा रंग पहिले आठवतो. पण तुम्ही रंगहिन पांढराशुभ्र मोर कधी पाहिला आहे का? अलिकडेच सोशल मिडियावर या अनोख्या मोराचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यात तो आपला सफेद पिसारा फुलवताना दिसला. हे दृष्य इतके सुदंर आणि अद्भूत होते की पाहणारे त्याच्या रुपावर मोहित झाले आणि हा व्हिडिओ वेगाने सोशल मिडियावर ट्रेंड करु लागला. चला व्हिडिओतील या दृष्यांविषयी जर सविस्तर चर्चा करुया.

साऊथ कोरियाच्या फॅशन शोमध्ये रोबोटचा जलवा, स्टेजवर माॅडल्ससोबत केला रॅम्पवाॅक! पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या; Video Viral

पांढऱ्या रंगाचा मोर…

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ नक्की कुठला आहे याची माहिती अद्याप समोर आली नाही पण व्हिडिओतील दृष्यांनी सर्वांनाच मंत्रमुग्ध केले आहे. यातील दृष्यांवर लोकांचा विश्वासच बसत नाहीये कारण यात पहिल्यांदाच लोकांना अनोखा पांढऱ्या रंगाचा मोर दिसून आला. त्याने जेव्हा आपले पांढरेशुभ्र पंख पसरवले तेव्हा यूजर्स त्याच्या साैंदर्याकडे फक्त पाहत राहिले. काहींनी हा खरोखरचा मोर आहे का असा प्रश्न विचारला तर काहींनी त्याच्या देखण्या रुपाचे मन भरुन काैतुक केले. दरम्यान हा मोर खरा की खोटा यामागचा संभ्रम आम्ही दूर करतो. खरंतर वास्तवात पांढऱ्या रंगाचे मोर अस्तित्वाद आहेत त्यामुळे हा व्हिडिओ खोटा नसून खरा असल्याचे स्पष्ट होते.

पांढऱ्या रंगाचे मोर दिसून येणे भारतात खूप शुभ मानले जाते. ते दिसायला अत्यंत आकर्षक आणि दुर्मिळ असतात. पांढऱ्या रंगाचा मोर हा मोराचीच एक प्रजाती आहे. ते श्रीलंकेसारख्या देशात अधिक प्रमाणात आढळून येतात. भारतातही असे काही पांढरे मोर अस्तित्वात आहेत.

अरे बापरे! चित्रपटाचा सीन सत्यात घडला, स्क्रीनला फोडून थेट आत घुसली स्कॉर्पिओ… प्रेक्षकांचा उडाला थरकाप; Video Viral

इंस्टाग्रामवर @snehu2k5 नावाच्या अकाऊंटवर पांढऱ्या मोराचे हे सुंदर दृष्य शेअर करण्यात आले आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘सुंदर, पण रानटी’. हे यासाठी लिहिण्यात आले कारण मोर दिसायला सुंदर असला तरी तो देखील सापांची शिकार करतो. व्हिडिओवर कमेंट्स करत अनेकांनी या दृष्यांवर आणि व्हिडिओच्या कॅप्शनवर आपले मत व्यक्त केले. यात एका यूजरने म्हटले की, “साप दुष्ट नसतो का? तो विषारी नसतो का? किंवा अपायकारक नसतो का? मग जर मोराने त्याला मारले, तर तो काहीतरी चांगलेच करत नाही का?”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मानव देखील चवीसाठी कोंबड्यांना मारतो” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “तो फारच सुंदर दिसत आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Rare white peacock video goes viral on social media marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2026 | 11:42 AM

Topics:  

  • animal
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

नेपाळ पुरातील सर्वात भावूक क्षण! कुटुंबाच्या प्राणांसाठी बापाने पणाला लावला जीव; भावूक करणारा Video Viral
1

नेपाळ पुरातील सर्वात भावूक क्षण! कुटुंबाच्या प्राणांसाठी बापाने पणाला लावला जीव; भावूक करणारा Video Viral

न पासपोर्ट, न व्हिसा! लेकीच्या लग्नाला पोहोचता आले नाही म्हणून आई-वडिलांनी केले ‘डिजिटल कन्यादान’; Video Viral
2

न पासपोर्ट, न व्हिसा! लेकीच्या लग्नाला पोहोचता आले नाही म्हणून आई-वडिलांनी केले ‘डिजिटल कन्यादान’; Video Viral

संपूर्ण शरीर चिखलात बुडालं, त्या निरागस डोळ्यांनी काळीज हेलावलं… नेपाळमधील ६ वर्षांच्या चिमुकलीच्या रेस्क्यूचा Video Viral
3

संपूर्ण शरीर चिखलात बुडालं, त्या निरागस डोळ्यांनी काळीज हेलावलं… नेपाळमधील ६ वर्षांच्या चिमुकलीच्या रेस्क्यूचा Video Viral

हातात तलवार अन् पेटत्या चितेवरून खाल्लं मानवी मांस! ‘किन्नर अघोरी’च्या व्हिडिओने खळबळ; संत समाज आक्रमक
4

हातात तलवार अन् पेटत्या चितेवरून खाल्लं मानवी मांस! ‘किन्नर अघोरी’च्या व्हिडिओने खळबळ; संत समाज आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.