(फोटो सौजन्य: Instagram)
साधारणपणे चित्रपटातील काही थरारक आणि मनोरंजक सीन्स पाहून लोक थक्क होतात पण या व्हिडिओत मात्र थिएटरमध्येच एक वेगळा सिनेमा दिसून आला. व्हिडिओमध्ये चित्रपटातील सीन सत्यात उतरताना दिसला ज्याला पाहून सर्वच घाबरले आणि थिएटरमध्ये एकच गोंधळ निर्माण झाला. आता यात नक्की काय घडलं ते चला सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एका थिएटरमधील दृष्य दिसले. प्रेक्षक आपआपल्या सीट्सवर बसून चित्रपटाचा आनंद लुटत होते आणि याचवेळी असेकाही घडले ज्याने सर्वांनाच धडकी भरवली. थिएटरमधील स्क्रिनवर आपल्याला चित्रपटातील एक सीन दिसतो. यात एक चारचाकी रस्त्यावरुन वेगाने धावत असते आणि पुढच्याच क्षणी स्क्रिन फोडून एक स्कॉर्पिओ थिएटरमध्ये एंट्री घेते. गाडीला असं अचानक आत आल्याचं पाहून प्रेक्षक घाबरतात आणि तिथे पळापळ सुरु होते. त्यांच्यासाठी हा कधीही न विसरता येणारा क्षण होता. काही लोक हैराण होऊन हे दृष्य पाहत असतात तर काही आपला जीव वाचवून तिथून पळत असतात. व्हिडिओतील हे दृष्य कोणत्या चित्रपटाहून कमी नाहीये पण हे सत्यात घडले की नाही किंवा जर खरंच हे घडलं तर ते कोणत्या थिएटरमध्ये घडून आलं यासंबंधित कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.
व्हायरल व्हिडिओ @mojopatrakar नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘आएका थरारक प्रँकदरम्यान, प्रत्यक्ष महिंद्रा स्कॉर्पिओ गाडीने सिनेमाचा पडदा फोडून आत प्रवेश करताच, प्रेक्षकांनी धक्क्याने किंचाळी फोडली’. दरम्यान व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी या दृष्यांवर प्रश्न उपस्थित करत घटनेवर आपले मत व्यक्त केले. काहींनी हे दृष्य खरे नसून एआयच्या मदतीने तयार केल्याचे म्हटले तर काहींनी मस्करीत म्हटलं की, लोक 4D एक्सपिरियंस घेऊन आले.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






