(फोटो सौजन्य: Instagram)
भारतात तामिळनाडू निवडणूकीदरम्यान वोटर्सचे स्वागत करण्यासाठी रोबोटचा वापर करण्यात आला होता. यासहच आता साऊथ कोरीयामध्येही फॅशनच्या दुनियेत रोबोटचा अनोखा वापर केल्याचे समोर आले आहे. इथे एका फॅशन इव्हेंट दरम्यान रोबोट्स माॅडल्सना टक्कर देत त्यांच्या जोडीला स्टेजवर रॅम्पवाॅक करताना दिसले. चला नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
रोबोटने केला रॅम्पवाॅक
दक्षिण कोरीयाची एंटरटेनमेंट टेक्नॅलॉजी कंपनी ‘गॅलेक्सी कॉरपोरेशन’ने अलिकडेच आपल्या एका फॅशन इव्हेंटमध्ये माॅडेलसोबत रॅम्पवाॅकसाठी रोबोटचा अनोखा वापर केला. या अनोख्या प्रकल्पाने सर्वांनाच थक्क केले तर सोशल मिडियावरही याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होऊ लागला. साऊथ कोरियातील सिओल इथे पार पडलेल्या ‘फिजिकल एआय’ (Physical AI) फॅशन शोचा मूळ उद्देश भविष्याला दाखवणे हा होता. भविष्यात माणसांच्या जोडीला रोबोट्स कसे काम करतील हे दाखवण्यासाठी या शोमध्ये माॅडेल्ससोबत रोबोट्सनाही रॅम्पवाॅकमध्ये सामील करण्यात आले होते.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, रोबोट्सने माॅडेल्ससोबत रॅम्पवाॅक करुन दाखवला. यावेळी प्रत्येक रोबोटने अगदी माॅडेलसारखेच कपडे परिधान केले होते. शो दरम्यान रोबोट्स माॅडेलप्रमाणेच चालताना आणि पोज देताना दिसले जे पाहून सर्वच थक्क झाले. हा अनुभव सर्वांसाठीच फार निराळा होता. भविष्यात फॅशनच्या दुनियेत कसे बदल घडून येऊन शकतात याचे उत्तम उदाहरण आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहता येते. हा व्हिडिओ दाखवून देतो की, भविष्यात रोबोट्सचा किती वेगवेगळ्या प्रकारे वापर करता येऊ शकतो. टेक्नाॅलाॅजी आणि क्रिएटिव्हिटीचा हा एक चांगला संगम होता ज्याने संपूर्ण जगाला थक्क करुन सोडले. व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच शेअर केला जात असून याला @cgtnamerica नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आले आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






