संतापजनक! ६ हजारांचं डिझेल भरुन स्कॉर्पिओ चालक पैसे न देता फरार; CCTV VIDEO व्हायरल (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुग्राममधील पटोडी-बिलासपूर रोडवर ही घटना घडली. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक काळ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी पेट्रोल पंपावर येते. गाडीचा चालक कर्मचाऱ्याला डिझेल भरण्यास सांगतलो. कर्मचारी गाडीची टाकी फुल करतो. त्याचे बिल ६००० हजार रुपये होते. डिझेल भरुन झाल्यानंतर कर्मचारी ऑनलाइन पेमेंटसाठी क्यूआर स्कॅनर आणायला बाजूला जातो. ही संधी साधून स्कॉर्पिओ चालक गाडी सुरु करुन तिथून पळ काढतो. चालक पैसे न देताचा फरार होतो. कर्मचारी गाडीच्या मागे पैसे घेण्यासाठी जातो. मात्र, तोपर्यंत उशिर झालेला असतो. गाडी पुढे निघून जाते. यावेळी काही दुचाकीस्वार स्कॉर्पिओचा पाठलागही करतात. परंतु गाडी वेगाने निघून जाते.
A ₹20 lakh Scorpio, but the driver fills up ₹6,000 worth of diesel and flees! 👀 Gurugram: At a petrol pump located on Bilaspur–Pataudi Road, the Scorpio driver fled the scene without paying after getting fuel. pic.twitter.com/jzU3J3Znbt — Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) June 27, 2026
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @gharkekalesh या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला हजारो लाईक्स आणि व्ह्यजू मिळाले आहेत. अनेकांनी यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. एका नेटकऱ्याने कमेंट केली आहे की, २० लाखांची गाडी घ्यायला याच्यांकडे पैसे आहे, पण ६ हजारांचं डिझेल चोरताना लाज नाही वाटत? तर दुसऱ्या एकाने आशा लोकांकडून आधी पैसे घेतले पाहिजेत असे म्हटले आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
बाप रे! पॅरिसच्या Eiffel Tower वर वीजेचा कडकडाट; थरारक दृश्य कॅमेरात कैद, VIDEO VIRAL
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






