Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मदर्स डेच्या कार्यक्रमासाठी बाबा बनले आई! लेकीसाठी सिंगल डॅडने घातला ड्रेस, व्हिडिओने जिंकली यूजर्सची मने

Emotional Video : शेवटी बापाचं काळीज ... मदर्स डे निमित्त शाळेत आयोजित केला खास कार्यक्रम. मुलीला आईची कमतरता भासू नये म्हणून बाबांनी घेतले एक्सट्रा एफर्स आणि असं काही करुन दाखवलं की संपूर्ण इंटरनेट त्यांच्यावर फिदा झालं.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 26, 2026 | 11:59 AM
मदर्स डेच्या कार्यक्रमासाठी बाबा बनले आई! लेकीसाठी सिंगल डॅडने घातला ड्रेस, व्हिडिओने जिंकली यूजर्सची मने

मदर्स डेच्या कार्यक्रमासाठी बाबा बनले आई! लेकीसाठी सिंगल डॅडने घातला ड्रेस, व्हिडिओने जिंकली यूजर्सची मने

Follow Us
Follow Us:
  • मुलीसाठी बाबांनी घेतला आईचा वेश
  • बाबांचं खास सरप्राईज पाहून मुलगी भावूक
  • व्हिडिओने जिंकली नेटकऱ्यांची मनं
प्रत्येक मुलासाठी आपली आई ही त्यांच्या जीवनातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती असते. आईला ममतेचे प्रतीक देखील मानले जाते. तिच्या मायेच्या पदरात मुलाला सुरक्षेची भावना मिळते. आईनंतर आपल्या आयुष्यात वडिल असतात जे आपल्याला समजून घेण्याचा, आपल्यासाठी ढाल बनून आपले संरक्षण करण्याचा प्रयत्न करत असतात. आई देवाघरी गेली की मुलीला वडिलांचाच एकमेव आधार असतो. वडिल आईची कमतरता भरुन काढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत असतात. अशात याच पार्श्वभूमीवर अलिकडे इंटरनेटवर एक भावनिक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये मुलीला खुश करण्यासाठी आणि मदर्स डेला तिला आईची कमतरता भासू नये यासाठी वडिलांनी एक गोड गोष्ट करु पाहिलेली असते. वडिलांचा उपक्रम पाहून यूजर्स चांगलेच खुश झाले असून व्हिडिओतील दृष्यांवर आता अनेकांनी आपल्या भावूक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

रोबोट आला VVIP पाहुणा बनून! बाउन्सर्सच्या सुरक्षेत केलं सँडविच दुकानाचं उद्घाटन; Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

व्हायरल व्हिडिओ हा थायलंडमधील असल्याचे सांगण्यात येत आहे. एका थाई वडिलांनी आपल्या मुलीला मदर्स डेच्या दिवशी एकटे वाटू नये यासाठी काही खास करु पाहिले होते. मुख्य म्हणजे ही मुलगी त्यांची स्वत:ची नसून त्यांनी मुलीला दत्तक घेतलेले असते. शाळेत मदर्स डे निमित्त खास कार्यक्रम आयोजिक केलेला असतो ज्यात मुलांच्या आईची उपस्थिती गरजेची असते. आता इतर विद्यार्थ्यांच्या आईला पाहिल्यानंतर निश्चितच मुलीला आपल्या आईची आठवण येऊ लागेल. असे होऊ नये आणि तिच्या मनात एकटेपणाची भावना येऊ नये यासाठी वडिलच आई बनून शाळेत हजेरी लावतात.

व्हिडिओत तुम्हाला वडिलांनी काळ्या आणि पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातल्याचे दिसते. इतकेच नाही तर खोटे केस देखील त्यांनी लावलेले असते. वडिल महिलेप्रमाणे गेटअप करुन शाळेत जातात आणि मुलीला एक खास सरप्राईज देतात. मुलगी निश्चितच वडिलांचे हे सरप्राईज पाहून खुश होते आणि आनंदाने त्यांना मिठी मारते. ही मिठी प्रेमाची, मायेची असते ज्यात सर्व काही सामावून गेल्यासारखं वाटतं.

फुकट मिळतंय मग काय! हायवेवर फेकलेल्या एक्सपायर्ड चॉकोलेट्सवर नागरिकांचा डल्ला; VIDEO तुफान व्हायरल

या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडिया प्लॅटफाॅर्मवर शेअर करण्यात आला असून व्हिडिओला आतापर्यंत ३ लाखाहून अधिकचे व्हूज मिळाले आहेत. मुलीच्या आनंदासाठी वडिलांनी घेतलेले प्रयत्न पाहून यूजर्स भावूक झाले असून अनेकांनी वडिलांच्या कृतीवर काैतुकांचा वर्षाव केला आहे. एका यूजरने म्हटले की, “का माहिती नाही पण हे पाहून मला रडायला आलं”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “त्याने तिला जन्म दिला नाही पण तो तिचा खरा बाबा आहे”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “आयुष्यात फक्त इतके एफर्स घेणारा नवरा भेटायला हवा”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही. 

Web Title: Single dad dresses as mom for daughters mothers day school event

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2026 | 11:59 AM

Topics:  

  • trending
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

रोबोट आला VVIP पाहुणा बनून! बाउन्सर्सच्या सुरक्षेत केलं सँडविच दुकानाचं उद्घाटन; Video Viral
1

रोबोट आला VVIP पाहुणा बनून! बाउन्सर्सच्या सुरक्षेत केलं सँडविच दुकानाचं उद्घाटन; Video Viral

फुकट मिळतंय मग काय! हायवेवर फेकलेल्या एक्सपायर्ड चॉकोलेट्सवर नागरिकांचा डल्ला; VIDEO तुफान व्हायरल
2

फुकट मिळतंय मग काय! हायवेवर फेकलेल्या एक्सपायर्ड चॉकोलेट्सवर नागरिकांचा डल्ला; VIDEO तुफान व्हायरल

८ वर्ष नवऱ्याच्या खिशातून लंपास केले १२ लाख, पण उंदरांनी केला पत्नीच्या ‘मायक्रो-प्लॅनिंग’चा चुराडा; घटनेचा Video Viral
3

८ वर्ष नवऱ्याच्या खिशातून लंपास केले १२ लाख, पण उंदरांनी केला पत्नीच्या ‘मायक्रो-प्लॅनिंग’चा चुराडा; घटनेचा Video Viral

Fact Check : काय सांगता! फ्लायओव्हरच्या पिलरवर वसलं संपूर्ण कुटुंब? VIDEO पाहून यूजर्सना बसला धक्का
4

Fact Check : काय सांगता! फ्लायओव्हरच्या पिलरवर वसलं संपूर्ण कुटुंब? VIDEO पाहून यूजर्सना बसला धक्का

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.