Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Fight Video Goes Viral: कानशिलात, लाथा-बुक्क्या अन् पट्टा… थिएटरमध्ये चाहत्यांचा संताप अनावर, VIDEO व्हायरल

Fight Video Goes Viral: ‘मिर्झापूर द मूव्ही’ला बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत असतानाच महाराष्ट्रातील एका PVR थिएटरमधील हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 06, 2026 | 05:01 PM
Fight Video Goes Viral: कानशिलात, लाथा-बुक्क्या अन् पट्टा… (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Fight Video Goes Viral: कानशिलात, लाथा-बुक्क्या अन् पट्टा… (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • महाराष्ट्रातील PVR थिएटरमध्ये ‘मिर्झापूर’ चाहत्यांमध्ये जोरदार हाणामारी.
  • गुड्डू भैय्या की मुन्ना भैय्या? या वादातून राडा झाल्याची माहिती.
  • हाणामारीचा VIDEO सोशल मीडियावर तुफान व्हायरल; दिल्लीतील घटनेचीही चर्चा.
Mirzapur Theatre Fight Video Viral: ‘मिर्झापूर द मूव्ही’ सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळतो. थिएटरमध्ये गर्दी खचाखच भरली आहे. पण या सगळ्या यशाच्या मधे एक वाईट बातमी पण समोर आली आहे. चित्रपट बघताना थिएटरमध्येच दोन गटात जोरदार हाणामारी झाली आहे. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो.

महाराष्ट्रातल्या एका PVR मध्ये हा राडा झाला. व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतंय की एक मुलगा दुसऱ्या मुलाला बेल्ट काढून मारतो. सोबत अजून दोन-तीन मुलं पण एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारत आहेत. थिएटरमध्येच हे सगळं घडलं. लोक सिनेमा बघायला आले होते, पण तिथेच फ्री मध्ये मारामारी बघायला मिळाली. Fight Video Goes Viral:

नेमकं भांडण कशावरून झालं?

हा वाद ‘मिर्झापूर’ मधल्या कॅरेक्टर वरून सुरू झाला. एक गट म्हणत होता गुड्डू भैय्या भारी आहे आणि दुसरा गट म्हणत होता मुन्ना भैय्या भारी आहे. या किरकोळ वादाचं रूपांतर मोठ्या भांडणात झालं. बोलता बोलता शिवीगाळ झाली आणि मग थेट हातापाईवर आले. आणखी एक धक्कादायक गोष्ट म्हणजे भांडण करणारी काही मुलं दारू पिऊन थिएटरमध्ये आली होती अशी माहिती मिळत आहे. नशेत असल्यामुळे त्यांना कशाचं भानच नव्हतं. थिएटरमध्ये सगळ्यांसमोर त्यांनी हा राडा केला.हा प्रकार फक्त महाराष्ट्रातच नाही तर दिल्लीत पण असाच एक प्रकार घडला आहे.दिल्लीत महिलेला अर्ध्यातूनच सिनेमा सोडून जावं लागलं.

दिल्लीतून पण एक व्हिडीओ समोर

त्यात एका महिलेने आपला अनुभव सांगितला आहे. ती महिला ‘मिर्झापूर द मूव्ही’ बघायला गेली होती. पण थिएटरमधल्या गोंधळामुळे तिला अर्ध्यातूनच सिनेमा सोडून घरी जावं लागलं.त्या महिलेने आरोप केला आहे की थिएटरमध्ये आलेले काही लोक पूर्ण नशेत होते. काहींनी दारू पिऊन एंट्री केली होती. ते मोठमोठ्याने ओरडत होते, शिव्या देत होते.

दारू पिऊन बनला तपस्वी! नशेत उड्डाणपुलाच्या छतावर चढून तरुण करू लागला साधना; Video Viral

त्यामुळे सिनेमा बघणं कठीण झालं होतं. जेव्हा व्यवस्थापनाला सांगितलं तेव्हा त्यांनी त्या लोकांना दुसऱ्या स्क्रीनवर जायला सांगितलं, पण त्यांना बाहेर काढलं नाही. शेवटी त्या महिलेने पोलिसांना बोलवायला सांगितलं, पण उशीर झाला होता आणि तिचा मूड पूर्ण खराब झाला होता, त्यामुळे ती घरी निघून गेली.

More action in the theatre than in the entire Mirzapur movie. 🤣 pic.twitter.com/ZtveGkJoH5 — Byomkesh (@byomkesbakshy) September 5, 2026

सिनेमाला पण चांगला प्रतिसाद

सिनेमाबद्दल ‘मिर्झापूर द मूव्ही’ चे दिग्दर्शन गुरमीत सिंग यांनी केलं आहे. यात पंकज त्रिपाठी, दिव्येंदू, अली फजल, रसिका दुग्गल आणि रवी किशन यांच्या मुख्य भूमिका आहेत. आधी या वेब सिरीजने प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं. कालीन भैय्या, गुड्डू, मुन्ना ही पात्रं लोकांच्या तोंडावर आहेत.

एकट्यानेच नदी साफ करणाऱ्या ‘बिट्टू तबाही’ला थेट परदेशी CEO कडून जॉब ऑफर! सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

सिनेमाला पण चांगला प्रतिसाद मिळतो. पण अशा हाणामारीच्या घटनांमुळे सिनेमाच्या नावाला गालबोट लागतंय. थिएटरमध्ये दारू पिऊन येणाऱ्या लोकांवर कारवाई व्हायला हवी आणि थिएटरच्या सुरक्षेवर पण प्रश्न उपस्थित होतोय. सिनेमा एन्जॉय करण्यासाठी लोक येतात, पण असा राडा झाला तर सामान्य प्रेक्षकांनी काय करायचं? आता या व्हायरल व्हिडीओवर पोलीस काय कारवाई करतात हे बघावं लागेल.

Web Title: Slaps kicks punches and a belt fans rage boils over in the theatre

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2026 | 05:01 PM

Topics:  

  • Entertainement News
  • Marathi News
  • viral video

संबंधित बातम्या

Chandrapur News: गिधाडांच्या अस्तित्वावर संकट; मलेरिया आणि भूकबळीमुळे संख्येत चिंताजनक घट
1

Chandrapur News: गिधाडांच्या अस्तित्वावर संकट; मलेरिया आणि भूकबळीमुळे संख्येत चिंताजनक घट

Raigad News: दहीहंडीचा असा थरार कधी पाहिलाय? २५ ते ४० फूट उंचीवरून विहिरीत उडी घेत गोविंदा फोडतात हंडी; कुर्डुसची अनोखी परंपरा
2

Raigad News: दहीहंडीचा असा थरार कधी पाहिलाय? २५ ते ४० फूट उंचीवरून विहिरीत उडी घेत गोविंदा फोडतात हंडी; कुर्डुसची अनोखी परंपरा

मीरा-भाईंदरमध्ये दहीहंडीचा थरार! जय महाराष्ट्र, जय मल्हारने रचला आठ थरांचा विक्रम
3

मीरा-भाईंदरमध्ये दहीहंडीचा थरार! जय महाराष्ट्र, जय मल्हारने रचला आठ थरांचा विक्रम

Hinjawadi IT Park Pune Protest : हिंजवडी आयटी पार्कमध्ये मूलभूत सुविधांसाठी अभियंते रस्त्यावर!
4

Hinjawadi IT Park Pune Protest : हिंजवडी आयटी पार्कमध्ये मूलभूत सुविधांसाठी अभियंते रस्त्यावर!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.