(फोटो सौजन्य: Instagram)
काय घडलं व्हिडिओत?
व्हिडिओमध्ये मागून एका पुरुषाचा आवाज ऐकू येतो , जो म्हणतो की कोणीतरी दारूच्या नशेत फ्लायओव्हर चढला आहे आणि स्वतःला संन्यासी समजत आहे. व्यक्तीला फ्लायओव्हरच्या छतावर पाहून अनेकांना धक्का बसला तर हा व्यक्ती नक्की तिथे पोहचला कसा याविषयीही अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला. सांगितले जात आहे की, काैटुंबक वादानंतर व्यक्तीने मद्यपानाचे सेवन केले आणि नशेतच तो उड्डाणपुलाच्या छतावर जाऊन बसला. हातांचा ओम तयार करुन माणूस अगदी साधकाप्रमाणे मांडी घालून फ्लायओव्हरवर बसलेला आढळला ज्याला पाहून कुणाही म्हणेल की, हा साधू तर नाही…
View this post on Instagram
संपूर्ण घटनेतील सर्वात चिंताजनक बाब म्हणजे, तरुण जिथे बसला होता, त्याच्या खालील रस्त्यावरून अनेक वाहने जात होती. इतक्या उंचीवर नशेच्या अवस्थेत बसणे त्याच्या जीवासाठी धोकादायक ठरु शकते. यावेळी केलेला थोडाही निष्काळजीपणा त्याच्या जीवावर बेतू शकतो. या घटनेत पुढे काय घडलं, व्यक्ती खाली उतरला की नाही आणि उतरला तर कसा याविषयीची कोणतीही सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही. व्हिडिओला @thebhartiyasarcasm_ नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आले आहे. अनेक यूजर्सने व्हिडिओतील या घटनेवर आपल्या प्रतिक्रया व्यक्त केल्या असून एका यूजरने म्हटले की, “हिमालय महाग पडला म्हणून फ्लायओव्हरवरच तपश्चर्या सुरू”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “दारू उतरली की साधुत्वही उतरेल बहुतेक!”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “नशा अशी असावी की फ्लायओव्हरही हिमालय वाटावा!”.
टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.






