(फोटो सौजन्य: X)
मागील काही काळापासून अवकाळी पावसाने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. याचाच फटका अनेक लग्नसमारंभांनाही पडल्याचे दिसून आले आहे. अचानक पडत असलेल्या या पावसाने लग्नसोहळ्यातही हजेरी दाखवली आणि लोकांच्या आनंदावर विर्जनाचे काम केले. अशीच एक घटना पुण्यतील एका लग्नसोहळ्यात घडून आली. पुण्यात पाऊस इतका विनाशकारी होता की लग्नस्थळी पोहोचण्यापूर्वीच सर्व काही भिजले आणि सर्व उद्ध्वस्त झाले. मात्र असे होऊनही त्यांचे लग्न उत्तम रीतीने पार पडले आणि यात मुस्लिम बंधुभावांनी त्यांची मदत केली. माणुसकीहून मोठे कोणताही धर्म नसते असे सांगितले जाते आणि या घटनेतून याचीच प्रचिती जगाला पाहायला मिळाली. नक्की काय घडलं ते चला सविस्तर जाणून घेऊया.
काय आहे प्रकरण?
पुण्यात संक्रांती कवडे आणि गलांडे यांचा विवाहसोहळा मोठ्या थाटामाटात सुरू होता. तथापि, मंगळवारी झालेल्या पावसाने लग्न समारंभाची मजा खराब केली. कार्यक्रमाची तयारी उध्वस्त झाली. एकुलत्या एका मुलीचे लग्नाचे स्वप्न भंग होत असल्याचे पाहताच वडील निराश झाले मात्र त्यांचे हे दुःख जाणून घेऊनच दुसऱ्या वडिलांनी त्यांना मदतीचा हात दिला. जवळच असलेल्या दुसऱ्या मंडपात मोहसीन आणि माहीनचे रिसेप्शन सुरू होते. हे पाहून वडील थेट मुस्लिम कुटुंबाकडे गेले आणि त्यांना त्यांच्या मुलीच्या लग्नात घडलेल्या घटनेबद्दल सांगितले. त्यावेळी, कोणताही विचार न करता, मुस्लिम कुटुंबाने लगेच संक्रांती आणि नरेंद्रला आणण्याची विनंती केली आणि लग्नासाठी त्यांच्या मुलाच्या रिसेप्शन हॉलकॅग वापर करण्याची परवानगी दिली.
When rain disrupted Sankruti Kawade & Narendra Galande’s Hindu wedding in Wanawadi, Pune, the Kazi family—hosting a Walima nearby—opened their venue to them. ❤️🌧️
Both couples shared one stage, one meal, one moment of unity.
This is the India we love. 🇮🇳#UnityInDiversity #Pune pic.twitter.com/Kwc1MTprMI— Rahil Mohammed ♨️ (@iamRahilM) May 22, 2025
संक्रांती आणि नरेंद्र यांचे लग्न एकाच हॉलमध्ये झाले होते, समारंभ संपताच काझी कुटुंबाचा कार्यक्रम पुन्हा सुरू झाला. एकाच व्यासपीठावर दोन वेगवेगळ्या धर्माच्या लोकांनी लग्न केले ही गोष्ट केवळ योगायोग नव्हती तर एकतेचे जिवंत उदाहरण होते. हे अनोखे मिलन आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. लोक हे दृश्य पाहून भारावले असून आपला देश एक सार्वभौम राष्ट्र आहे हे या घटनेने पुन्हा सिद्ध करून दाखवले आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.