(फोटो सौजन्य: Instagram)
मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये दररोज हजारो प्रवासी प्रवास करत असतात. अशात अनेकदा त्यांच्यात वादावादी, भांडण आणि मारामारी सुरु असतात. मुंबई लोकल आणि भांडण हे जणू आता सामान्यच झाले आहे. लोकल ट्रेनमधील हाणामारीचे अनेक व्हिडिओज सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. त्यातच आता इथे आणखीन एक अशीच घटना व्हायरल झाली आहे ज्यात एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला जीव तोडून मारताना दिसून आला. कोणताही विचार न करता तो सटासट दुसऱ्या व्यक्तीला मारू लागतो आणि हे दृश्य पाहून सर्वांच्याच अंगावर शहारे येतात. व्हिडीओत काय घडलं ते चला सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
सदर व्हिडिओतील दृश्य आहे मुंबई लोकलमधील असल्याचे सांगितले जात आहे. यात आपल्या जनरल डब्यातील हाणामारीचे दृश्य दाखवण्यात आले आहे. व्हिडिओत तुम्ही पाहू शकता यात काही लोकांचा घोळखा दिसून येतो आणि याचवेळी एक व्यक्ती त्याच्या समोर सीटवर बसलेल्या व्यक्तीला जोरजोरात मारत असतो. आपल्या संपूर्ण ताकदीने तो त्याच्यावर हल्ला करतो आणि सटासट अजिबात ब्रेक न घेता मारतच जातो. हे दृश्य पाहून आजूबाजूची लोकही घाबरतात आणि ते पाहण्यासाठी उभे राहतात, तर काही मागे वळून हे दृश्य पाहू लागतात पण व्यक्तीचा राग पाहता त्याला थांबवण्याचे धाडस कुणालाही होत नाही. ज्या प्रकारे व्यक्ती दुसऱ्या माणसाला मारत असतो ते पाहून ही WWE मॅच असल्याचा भास युजर्सना होतो. घटनेचा व्हिडिओ आता मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर शेअर केला जात असून यामागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
मुंबई लोकलमधील हाणामारीचा हा व्हिडिओ @domumbai_ नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘लोकल ट्रेनमध्ये WWE’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओला आतापर्यंत मोठ्या प्रमाणात शेअर केले जात असून हजारो युजर्सने व्हिडिओला लाइक्स दिले आहेत. तसेच अनेकांनी याच्या कमेंट सेक्शनमध्ये घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हे हास्यास्पद नाही” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “अरे मारून टाकतो का त्याला थांबवा त्याला, WWE सुरु झालाय”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.