
हातात तलवार अन् पेटत्या चितेवरून खाल्लं मानवी मांस! 'किन्नर अघोरी'च्या व्हिडिओने खळबळ; संत समाज आक्रमक
महामंडलेश्वर शैलेशानंद गिरी यांनी म्हटले आहे की, अघोरी प्रथांना स्वतःची प्रतिष्ठा आहे आणि तांत्रिक विधी गोपनीय ठेवले पाहिजेत. त्यांचे सार्वजनिक प्रदर्शन अयोग्य आहे. अघोरी आखाड्याचे प्रमुख आणि राष्ट्रीय अध्यक्ष, खडेश्वरी अघोरी बाबा विष्णूनाथ यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. सनातन आणि अघोरी परंपरांच्या नावाखाली ढोंगीपणा पसरवणाऱ्या अशा लोकांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
उज्जैनच्या चक्रतीर्थ श्मशान घाटावर तृतीयपंथी अघोरीने जळत्या चितेवरुन मानवी मांस खाल्ल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संत समाज आणि भाविकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होऊ लागली. अघोरीच्या या कृत्याला अमानवीय म्हणत अनेकांनी त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. तथापि, गढकालिका माता मंदिरात झालेल्या एका वादानंतर या तृतीयपंथी अघोरीला आखाड्यातून हाकलवून लावल्याचे सांगितले जात आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू यात दिसते की, अघोरी हातातील तलवार घेऊन जळत्या चितेजवळ जातो. व्यक्तीचे शरीर जळत असताना तलवारीने तो त्यातील मासांचा एक तुकडा बाहेर काढतो आणि मग हातात हा तुकडा घेऊन निर्दयीपणे ते खाऊ लागतो.
⚠️ Viewers discretion advised 🚨 Trans Aghori in Ujjain filmed eating alleged human flesh pulled from a burning funeral pyre.#Cannibal #India #MadhyaPradesh pic.twitter.com/Of6o12xsd9 — Public News X (@PublicNewsX) August 31, 2026
या घटनेचा व्हिडिओ @PublicNewsX नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत असून अनेक यूजर्सने व्हिडिओवर कमेंट्स करत अघोरीच्या या कृत्यावर आपले मत व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, “अघोरी लोक काहीही करु शकतात”, दुसऱ्या यूजरने लिहिले आहे, “ईई त्याला असं करताना काहीचं कसं वाटलं नाही”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “बापरे, कुणी असं कसं करु शकतं, याच्यावर कारवाई व्हायला हवी”.
टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.