
अबब! काका बनले हत्तीचा सोफासेट, धावत आला अन् पाठीवरच जाऊन बसला... दृश्य पाहाल तर हसू आवरणार नाही; Video Viral
काय घडलं व्हिडिओत?
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात दिसते की, एका भरगच्च रस्त्यावर गाड्या आणि काही लोक थांबलेले आहेत. ते रस्त्यावर थांबून काहीतरी बघत असतात आणि इथेच रस्त्याच्या मधोमध एक भलामोठा हत्ती एका काकांच्या अंगावर बसल्याचे दिसून येते. काका या परिस्थतीतून बाहेर पडण्याचा सर्वोतरी प्रयत्न करत असतात पण हत्तीच्या वजनाने त्यांना यातून बाहेर पडता येत नाही. व्हिडिओत सर्व लोक हा तमाशा आपल्या खुल्या डोळ्यांनी पाहत असतात पण कुणीही त्यांची मदत करायला जात नाही जी एक आश्चर्याची गोष्ट आहे. लोक हे दृश्य आपल्या मोबाईलमध्ये कैद करतात पण मदतीचा हात मात्र कुणीही पुढे करत नाही. तथापि आता व्हिडिओविषयी अनेक दावे केले जात आहे. काही युजर्सचे म्हणणे आहे की हा व्हिडिओ खरा नसून त्याला AI च्या मदतीने तयार करण्यात आले आहे.
दरम्यान हा व्हिडिओ @remixmaster.s2k नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “पागल लोक आहेत मदतीला धावून जायला पाहिजे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “कोणी त्यांची मदत का करत नाहीये?” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “हा व्हिडिओ खरा वाटतं नाही, तो एआयने बनवला आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.