(फोटो सौजन्य: Instagram)
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये महिला लाल साडी घालून अस्थिकलशासह एका “तेरी अदाओं पर मारती हूं” गाण्यावर डान्स करताना दिसते. सुंदर साडी, मेकअप आणि कलश घेऊन महिलेने केलेला डान्स लोकांचे लक्ष तर वेधतो पण शमशानाचे पवित्र न जपल्याने युजर्सच्या भावना दुखावतो. लोक व्हिडिओतील दृश्ये पाहून चांगलेच संतापले असून अनेकांनी कमेंट्समध्ये महिलेच्या या कृत्यावर आपला राग व्यक्त केला आहे. व्हिडिओमध्ये ही रील स्मशानात शूट झाल्याचा दावा करण्यात आला असला तरी कमेंट्समध्ये काहींनी ते स्मशान नसून सामान्य ठिकाण असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान हा व्हिडिओ @sonarasania नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “आता ही काय शमशानात सर्वांना उठवूनच ऐकणार आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ताई तुला यासाठी दुसरी कोणती जागा नाही का मिळाली?” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “तिला भुतांसोबत रोमान्स करायचा आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






