श्रीनगर : पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला (Punjabi Singer Siddhu Moose Wala) याच्या हत्येनंतरही त्याची गाणी जगभरात ऐकली जात आहेत. पाकिस्तानमधील असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. भारत-पाकिस्तान सीमेवरवरील (LOC) व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Video Viral) झाला आहे. पाकिस्तानात लावलेल्या गाण्यावर भारतीय सैनिक (Indian Army) नाचताना दिसत आहेत.
पाकिस्तानी सैन्याने सीमेपलिकडे स्पीकरवर सिद्धू मुसेवालाचे गाणे लावले. तर सीमेच्या अलिकडे भारतीय जवान त्या गाण्यावर नाचत आहेत, असा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर अनेक प्रतिक्रियाही येत आहेत.
सिद्धू मुसेवालाचं गाणं पाकिस्तानात वाजलं; भारतीय सैनिक थिरकले! #ViralVideo pic.twitter.com/f5LXLdhqmY
— Vaishnavi Karanjkar (@vaishnavikaran4) August 27, 2022
व्हि़डीओ क्लिपमध्ये पाकिस्तानी सैनिक (Pakistani Army) स्पीकरवर सिद्धू मुसेवालाचे ‘बंबीहा बोले…’ हे गाणे वाजवत आहेत. तर भारतीय लष्कराचे जवान नाचत आहेत. पाकिस्तानी सैन्य त्यांच्या सीमेवरून हा नाच पाहत आहे. त्यांनी हातवारे करत भारतीय सैनिकांना दाद दिल्याचेही या व्हिडीओमध्ये दिसत आहे.