Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऐनवेळी इंडिगोची फ्लाईट रद्द, नवदाम्पत्याने स्वतःच्याच रिसेप्शनला लावली ऑनलाईन हजेरी; Video Viral

Indigo Flights Cancelled : स्वतःच्याच रिसेप्शन पार्टीमध्ये जोडप्याने घेतली व्हर्चुअल एंट्री! इंडिगोने अचानक आपल्या फ्लाईट्स कॅन्सल केल्यामुळे जोडप्याला याचा मोठा फटका बसला. घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल होतोय.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 05, 2025 | 02:54 PM
ऐनवेळी इंडिगोची फ्लाईट रद्द, नवदाम्पत्याने स्वतःच्याच रिसेप्शनला लावली ऑनलाईन हजेरी; Video Viral

ऐनवेळी इंडिगोची फ्लाईट रद्द, नवदाम्पत्याने स्वतःच्याच रिसेप्शनला लावली ऑनलाईन हजेरी; Video Viral

Follow Us
Close
Follow Us:
  • इंडिगोच्या सुमारे ९०० फ्लाईट्स रद्द करण्यात आल्या आहेत
  • कर्नाटकातील एका जोडप्याला याचा मोठा फटका बसला
  • स्वतःच्याच रिसेप्शन पार्टीत जोड्यापची व्हर्चुअल एंट्री
देशभरातील सुमारे ९०० इंडिगो फ्लाईट्स रद्द करण्यात आल्या आहेत ज्यामुळे लोकांच्या दैनंदिन जीवनावर याचा मोठा प्रभाव पडताना दिसून आला. अनेकांची कामे यामुळे रखडली तर एका जोडप्याला स्वतःच्याच रिसेप्शनमध्ये जाता आलं नाही. होय, बुधवारी ३ डिसेंबर रोजी इंडिगोने अचानक आपल्या फ्लाईट्स कॅन्सल केल्यामुळे कर्नाटकातील हुबळी येथे एका लग्नाच्या रिसेप्शन पार्टीत मोठा गोंधळ दिसून आला. फ्लाईट्स कॅन्सल झाल्यानंतर जोडपे भुवनेश्वरलाच अडकले. पाहुणेमंडळी उपस्थित झाल्यानंतर हा सोहळा अचानक कॅन्सल करणं त्यांना पटलं नाही ज्यानंतर जोडप्याने ऑनलाइन व्हिडिओ कॉलद्वारे स्वतःच्याच रिसेप्शन पार्टीला हजेरी दाखवली. चला घटनेविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

वेड्यांचा बाजार! पायाला आग लावून दाखवत मारत होता हुशारी, तितक्यातच हवेची झुळूक आली अन् संपूर्ण शरीर जळू लागलं; Video Viral

काय प्रकरण आहे?

समोर आलेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील हुबळी येथे मेधा क्षीरसागर आणि भुवनेश्वर येथील संगम दास यांची रिसेप्शन पार्टी आयोजित करण्यात आली होती. दोघेही बेंगळुरूमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर असून २३ नोव्हेंबर रोजी भुवनेश्वरमध्ये त्यांचे लग्न झाले होते. लग्नानंतर, २ आणि ३ डिसेंबर रोजी वधूच्या मूळ गावी हुबळी येथे त्यांच्या लग्नाची रिसेप्शन पार्टी आयोजित करण्यात आली होती. यासाठी कुटुंबीयांनी हुबळी येथील गुजरात भवनमध्ये विस्तृत तयारी केली होती.

जोडप्याने २ डिसेंबर रोजी भुवनेश्वरहून हुबळीला बेंगळुरूमार्गे जाण्यासाठी फ्लाईट बुक केले होते, तर काही नातेवाईकांनी भुवनेश्वर-मुंबई-हुबळी अशी एअरलाईन घेतली होती. तथापि, २ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजताची एअरलाईन वारंवार उशिरा सुरू झालीच नाही तर दुसऱ्या दिवशी, ३ डिसेंबर रोजी पहाटे ४-५ वाजता अचानक रद्द करण्यात आली.

A newly wed techie couple forced to attend their own reception online after their Indigo flights from Bhubaneswar-Hubbali were cancelled. The bride’s parents having already invited relatives decided to broadcast their live feed on a big screen. #IndigoDelay #FlightCancellations pic.twitter.com/jO7lTgm8lZ — Deepak Bopanna (@dpkBopanna) December 5, 2025

मंत्री जी आपसे ना हो पायेगा…! फुटबॉलला लाथ मारताच जमिनीवर कोसळले अन् सर्वांच्याच चेहऱ्यावर हसू उमलले; Video Viral 

जोडप्याची अचानक फ्लाईट रद्द झाल्यामुळे दोघेही हुबळीला आपल्या रिसेप्शन पार्टीसाठी वेळेवर पोहोचू शकले नाहीत. रिसेप्शन रद्द करण्याऐवजी, कुटुंबाने ते ऑनलाइन करण्याचा निर्णय घेतला. कार्यक्रमाच्या ठिकाणी स्क्रीन लावण्यात आल्या आणि वधू-वरांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पाहुण्यांशी संपर्क साधला. वधूच्या पालकांनी स्टेजवर त्यांची जागा घेतली आणि पाहुण्यांचे स्वागत केले.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral newlyweds attend their own reception online as indigo cancelled flights at the last minute viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 05, 2025 | 02:53 PM

Topics:  

  • couple
  • IndiGo
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

Indigo flights cancelled : Indigo च्या फाईट रद्द झाल्याने विमानतळावर उडाला सावळा गोंधळ; राहुल गांधींनी सरकारला घेरले
1

Indigo flights cancelled : Indigo च्या फाईट रद्द झाल्याने विमानतळावर उडाला सावळा गोंधळ; राहुल गांधींनी सरकारला घेरले

“फ्लाईट कॅन्सल झाली याचा मनस्ताप, पण…”; Indigo च्या सावळ्या गोंधळावर अमोल कोल्हे भडकले
2

“फ्लाईट कॅन्सल झाली याचा मनस्ताप, पण…”; Indigo च्या सावळ्या गोंधळावर अमोल कोल्हे भडकले

Pakistan Parliament : पाकिस्तानी संसदेत घुसले गाढव, लोक म्हणाले, शाहबाज शरीफ; PTI च्या VIRAL VIDEO मुळे हास्याचा पाऊस
3

Pakistan Parliament : पाकिस्तानी संसदेत घुसले गाढव, लोक म्हणाले, शाहबाज शरीफ; PTI च्या VIRAL VIDEO मुळे हास्याचा पाऊस

Indigo flights cancelled : विमान रद्द केल्याने इंडिगो कंपनीचं निघालं दिवाळं! नुकसानीचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
4

Indigo flights cancelled : विमान रद्द केल्याने इंडिगो कंपनीचं निघालं दिवाळं! नुकसानीचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.