
ताजमहालच्या फाऊंटनमध्ये माकडांची सुरु झाली पुल-पार्टी, मस्ती करत इकडून तिकडून बागडले अन् पर्यटक पाहतच राहिले; Video Viral
ताजमहाल पाहायला पर्यटक तर नेहमीच येतात पण यावेळी माकडांच्या टोळीने जगातील सातवा अजूबा पाहण्याचा निर्णय घेतला. वास्तूच्या आत जाताच त्यांना इथे एक पाण्याचा झरा दिसला आणि मग काय एकामागून एक सर्व माकडांनी या झऱ्यामध्येच पूल-पार्टी करण्याचा निर्णय घेतला. या घटनेचे दृष्य आता सोशल मिडियावर शेअर करण्यात आले असून यूजर्सने यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता, यात माकडांचा एक गट ताजमहालच्या आतील परिसरात असलेल्या फाऊंटनवर पाण्याची मजा लुटताना दिसून आला. माकड पाण्यात इकडून तिकडून बागडत होते तर पर्यटक हे दृष्य आपल्या कॅमेरात कैद करुन घेत होते. ताजमहालच्या परिसरात प्राण्यांचा असा उच्छाद पहिल्यांदाच घडला असावा ज्यामुळे घटनेविषयी अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. व्हिडिओतील दृष्ये जरी मनोरंजक वाटत असली तरी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) आणि ताजमहालच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत. प्राणी इतक्या सहजपणे आणि निर्भयपणे तलावापर्यंत कसे पोहोचले? पर्यटकांच्या सुरक्षेचा विचार करता, माकडांना या संकुलात प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी पुरेशी व्यवस्था का नाही? असे प्रश्न यूजर्सने उपस्थित केले.
घटनेचा व्हिडिओ @The Siasat Daily नावाच्या फेसबुक अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेची माहिती देण्यात आली असून अनेक यूजर्सने या घटनेवर आपल्या प्रतिक्रिय व्यक्त केल्या आहेत. एका यूजरने म्हटले की, “त्यांना माकड म्हणू नका, हनुमानजी म्हणा”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “त्यांना थंड होऊ द्या. बाहेर खूप उष्णता आहे” आणखी एका यूजरने लिहिले आहे, “पण ते सर्व आत आलेच कसे? ताजमहालच्या सुरक्षा व्यवस्थापनाकडे लक्ष देण्याची गरज आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.