(फोटो सौजन्य: Instagram)
याच पार्श्वभूमीवर आता सोशल मडियावर आणखी एक घटना समोर आली आहे, ज्यात महिलेने गुगल मॅपचा वापर करुन कारला रेल्वे ट्रॅकवर चढवल्याचे धक्कादायक दृष्य दिसून आले. ही घटना अमेरिकेच्या सियाटलमध्ये घडून आल्याची माहिती आहे. झालं असं की, ७० वर्षीय महिला GPS चा वापर करत आपल्या कारमधून गंतव्यस्थानापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत होती. पण GPS ने तिला भलताच रस्ता दाखवला ज्यामुळे ती कार घेऊन रेल्वे ट्रॅकवर घुसली. मुख्य म्हणजे यानंतरही तिने आपली गाडी मागे घेतली नाही तर GPS ला फाॅलो करत ती साधारण ४०० मीटरपर्यंत आपली चारचाकी रेल्वे ट्रॅकवर चालवत राहिली. शेवटी माउंट बेकर नावाच्या स्टेशनवर जाऊन तिच्या गाडीला थांबवण्यात आले.
व्हायरल व्हिडिओ
या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये दिसते की, एक लाल रंगाची चारचाकी रेल्वे ट्रॅकवर चालत आहे. रेल्वे स्थानकावर फार वर्दळ नसल्याने कुणीही या गोष्टीची दखल घेतली नाही. परंतु रेल्वेच्या एका स्टाफने जेव्हा हा प्रकार पाहिला तेव्हा त्याने धावत-पळत येऊन महिलेला गाडीतून उतरण्यास सांगितले. महिला यानंतर बाहेर आली आणि तिने काय घडलं याची माहिती दिली. सांगितलं जातंय की, या घटनेमुळे शहरातील लाईन १ ची लाईट रेल सेवा सुमारे दोन तासांसाठी स्थगित करण्यात आली होती. सुरक्षेच्या कारणास्तव आपत्कालीन टीमने कारला ट्रॅकवरुन हटवले आणि यानंतर रेल्वे सुरु करण्यात आली.
View this post on Instagram
रिपोर्ट्सनुसार, महिला जेव्हा आपल्या गाडीतून जात होती तेव्हा तिच्यासमोर एक रस्ता आला जो काहीसा रेल्वे ट्रॅकसारखा दिसत होता. अशात जेव्हा तिची गाडी खरोखरच्या रेल्वे ट्रॅकवर आली तेव्हा ती गोंधळून गेली आणि तिने यालाही रस्ता समजून त्यावर आपली गाडी चढवली. पोलिसांनी सांगितले की, महिला नशेत होती आणि ती फार गोंधळलेली दिसत होती.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






