
डान्स की स्टंट? महिलेची कमाल... चक्क जळत्या चुलीला मडक्यासह डोक्यावर ठेवलं अन् पाहून नेटकरी झाले अवाक्; Video Viral
काय घडलं व्हिडिओत?
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं तर तुम्हाला दिसेल की, एक महिला आपल्या घराच्या समोर रील बनवत आहे. यात ती गाण्यावर डान्स करून दाखवत असते पण खरी कमाल यात नाही. महिलेने साडी परिधान करून डोक्यावर एक जळती चूल ठेवलेली असते. मुख्य म्हणजे या चुलीवर एक मडकं देखील ठेवलेलं असत ज्यावर काहीतरी शिजत असतं. आपल्या डोक्यावर हा सगळा भार घेऊन ती नाचत असते जे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटते. मुख्य म्हणजे व्हिडिओच्या शेवटपर्यंत महिला आपला बॅलन्स बनवून ठेवते आणि तिच्या डोक्यावरील जळती चूल खाली पडू देत नाही, जे खरोखर प्रशंसनीय आहे.
दरम्यान हा व्हिडिओ @kalpanakumariofficiall नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “या असं काहीतरी करतात आणि मग बोलतात नवरा मारतो म्हणून…” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “खूप सुंदर” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “पण तिने हे केलं कसं?”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.