नागपूर-पुणे वंदे भारतचे स्वप्न पूर्ण, १० ऑगस्टला PM नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण
सोशल मीडियावर रोज काही ना काही वेगळे व्हायरल होत असते. तुम्ही अनेक भांडणाचे व्हिडीओ पाहिले असतील. सध्या असाच एक पण वेगळा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेला व्हिडीओ वंदे भारत ट्रेनचा असल्याचा दावा केला जात आहे. यामध्ये ट्रेनच्या केबिनमध्ये लोको पायलटची गर्दी दिसत आहे. मोठ्या संख्येने लोको पायलट ट्रेन चालवण्यासाठी वाद घालत असल्याचे दिसत आहे.
ट्रेन चालवण्यासाठी वाद सुरू
हा व्हिडिओ आग्रा ते उदयपूर दरम्यान सुरू झालेल्या वंदे भारत एक्स्प्रेसचा असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ एक्सवर @gharkekalesh या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, ट्रेन चालकांचा जमाव वंदे भारतच्या लोको पायलट केबिनमध्ये दिसत आहे. ट्रेन चालवण्यासाठी सगळे उत्सुक आहे. अनेकजण गेटच्या खिडकीतून आत जाण्याचा प्रयत्न करत आहेत. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, ट्रेनचा दरवाजा उघडताच लोक एकमेकांना आत जाण्यासाठी ढकलत आहेत. इतके लोको पायलट केबिनमध्ये घुसल्याने केबिनमध्ये गर्दी आहे.
ट्रेनचालवण्यासाठी स्पर्धा चालु असल्यासारखे वाटत आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही ट्रेन चालवण्यासाठी चालकांमध्ये इतकी स्पर्धा का आहे? तर रेल्वेमध्ये चांगल्या ट्रेन्स चालवल्याने लवकर आणि चांगले प्रमोशन आणि इन्क्रीमेंट मिळते. म्हणून लोको पायलटमध्ये वाद सुरू असावा. हा व्हिडीओ पाहून अनेकजण हैराण झाले आहेत. अनेकांनी व्हिडीओचा आनंद लुटला आहे. व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात असून आत्तापर्यंत हजारोंनी लाईक आणि कमेंट्स केल्या आहेत.
व्हायरल व्हिडीओ
Kalesh among Loco pilots to operate Vande Bharat Train
🎥: @JharkhandRail
pic.twitter.com/cjllmCEhLe— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) September 3, 2024
नेटकरी झाले हैराण
व्हायरल झालेला व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक त्यावर कमेंट करून लोको पायलटसोबत खूप मजा घेत आहेत. एका युजरने म्हटले आहे की, प्रत्येकाला अर्धा तास एक-एक करून ट्रेन चालवायला मिळेल. तर दुसऱ्या एकाने लिहिले आहे की, मी पहिल्यांदाच सरकारी कर्मचारी आपले काम करण्यासाठी एकमेकांशी भांडताना पाहिले आहेत. आणखी एका युजरने सांगितले की, प्रत्येकाला त्यांचे काम वाटून देण्यात आले आहेत पण तरीही ते एकमेकांशी भांडत आहेत कारण त्यांना फक्त चांगल्या गाड्या चालवल्याने त्यांचा पगार वाढतो आणि प्रमोशन मिळते.