
मंदिरात रिलबाजी करणं भोवलं... दर्शनाच्या ओळीत ठुमके लावताच पोलिसांनी केली कारवाई; Video Viral
हाॅटेलमध्ये प्रियकरासोबत रंगेहात पकडली गेली पत्नी, पतीने हाणामारी करतच काढलं बाहेर; Video Viral
काय घडलं व्हिडिओत?
सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये मुलगी रांगेत उभे असलेल्या भाविकांसमोर रिल शूट करताना दिसते. तिने गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केलेला असतो आणि कपाळावर चंदन लावत ती रिल शूट करायला सुरुवात करते. डान्सचे काही स्टेप्स फाॅलो करत ती गाण्यावर ठेका धरते आणि आजूबाजूचे लोक तिला एकटक नजरेने पाहू लागतात. यादरम्यानच मागे उभ्या असलेल्या एका पोलिस अधिकाऱ्याचे मुलीच्या वागणूकीवर लक्ष जाते. मंदिराच्या आवारात भाविकांसमोर ती रिल शूट करत आहे हे पाहून त्यांना राग अनावर होतो. व्हिडिओमध्ये पोलिस रागातच मुलीला ओरडताना दिसतात. इतकंच नाही तर रांगेतून बाहेर जाऊन हा प्रकार मंदिराबाहेर करावा असेही ते तिला सांगताना दिसतात. या घटनेवर आता यूजर्सच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळत असून एका पवित्र आणि आध्यात्मिक स्थळाला रिलस्पाॅट बनवू नये असा प्रतिक्रिया अनेकजण देत आहेत.
Ban them from every temple in India pic.twitter.com/V1IhyElnta — Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) July 15, 2026
या घटनेचा व्हिडिओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘त्यांना भारतातील प्रत्येक मंदिरातून बॅन करा’. व्हिडिओला 1.3 मिलियनहून अधिकचे व्ह्यूज मिळाले असून अनेक यूजर्सने कमेंट सेक्शनमध्ये घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यात एका यूजरने म्हटले की, “अशाच प्रकारच्या वर्तनामुळे पवित्र स्थळांची प्रतिष्ठा कमी होते. अशा वर्तनावर निर्बंध असायला हवेत”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मंदिराच्या परिसरात अत्यंत बेजबाबदार आणि मूर्खपणाचे प्रकार घडू लागले आहेत. मंदिर प्रशासन या लोकांवर कारवाई का करत नाही?”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “ही मुलगी कोण आहे… किती निर्लज्ज आणि घृणास्पद वागणूक! केवळ क्षणभराच्या प्रसिद्धीसाठी हे सर्व चाललंय. तिला इथून हाकलूनच दिलं पाहिजे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.